हिंगोली लोकसभा मतदारसंघात २३ पैकी २१ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. यात बसप, भारिप-बहुजन महासंघ व आम आदमी पक्षाचा समावेश आहे.
मदानात २३ उमेदवार होते. काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार राजीव सातव व शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडे या दोघांनीही एकमेकांविरुद्ध नाव व आडनाव एकच असलेले उमेदवार शोधून रिंगणात उतरविले होते. या नवख्या उमेदवारांनी काही प्रमाणात मते घेतली. निवडणूक मदानात भारिप-बहुजन महासंघ व बसपचे उमेदवार कोणाच्या विजयाचे गणित बिघडवितात याकडे सर्वाचे लक्ष होते. प्रमुख उमेदवारांनी त्यासाठी व्यूहरचना केली होती. मात्र, या दोन पक्षांसह आम आदमीच्या उमेदवारास आपला प्रभाव दाखविता आला नाही.
देशात सर्वत्र मोदींची लाट होती. त्यामुळे वानखेडे यांचे मताधिक्य वाढले. त्याला नवीन मतदारांची साथ लाभली. मात्र, त्याचा फायदा घेण्यास खुद वानखेडेच कमी पडल्याचे बोलले जात आहे. ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांनी शिवसेनेंतर्गत गटबाजीच्या आहारी जाऊन काही पदाधिकारी बदलले. इतकेच नाही, तर माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा व माजी आमदार गजाननराव घुगे यांच्याशी जमवून घेण्याचे प्रयत्न मनापासून केले नाहीत. त्याचाही फटका वानखेडे यांना बसून अगदी काठावरच्या मतदानाने पराभवाचे तोंड पाहण्याची वेळ आली.
या मतदारसंघात इतर पक्षांचे व अपक्ष उमेदवार किती मतदान घेतात, त्यावरच प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा असताना हे उमेदवार मात्र इतरांचे गणित बिघडवणे दूरच, उलट स्वतची अनामत रक्कमदेखील वाचवू शकले नाही. मतदानापकी वैध एक षष्टांश मते मिळविणे क्रमप्राप्त असताना ही किमया दोन प्रमुख उमेदवार वगळता इतर कोणीही उमेदवार करू शकला नाही.
बसपचे चुन्नीलाल जाधव यांना २५ हजार १४५ मतदान झाले. त्या तुलनेत गेल्या निवडणुकीतील बसपचे चव्हाण यांना १ लाख ११ हजार ३५७ मतदान झाले. भारिप-बहुजन महासंघाचे रामराव राठोड यांना ९ हजार ७७७ मतदान झाले. गेल्या वेळी याच पक्षाचे अॅड. माधवराव नाईक यांना ५२ हजार ३२९ मतदान झाले होते. त्या तुलनेत या निवडणुकीत दोन्ही पक्षांचे उमेदवार प्रभावशून्य ठरल्याचे झालेल्या मतदानावरून आढळून आले.
गेल्या निवडणुकीत वानखेडे यांना ३ लाख ४० हजार १४८ मतदान झाले. या वेळी हे प्रमाण वाढून ४ लाख ६५ हजार ७६५ मते त्यांना मिळाली. मात्र, मतदान वाढूनही वानखेडे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. याचे मुख्य कारण इतर पक्षांना मिळालेली कमी मते हेच असल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार सूर्यकांता पाटील यांना २ लाख ६६ हजार ५१४ मते मिळाली होती. या वेळी िहगोलीची जागा काँगेसला सुटल्याने राजीव सातव यांना उमेदवारी मिळाली आणि त्याचे त्यांनी चीज केले. महाराष्ट्रात सर्वत्र काँग्रेसची धूळधाण होत असताना सातव यांनी मात्र ४ लाख ६७ हजार ३९७ मते घेतली. राष्ट्रवादीपेक्षा दुप्पट मते घेऊनही त्यांचा काठावरच्या मतदानाने विजय झाला.
अनामत रक्कम जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये चुन्नीलाल जाधव, डी. बी. नाईक, उत्तमराव राठोड, पांडुरंग देसाई, रामराव राठोड, अपक्ष म्हणून मैदानात असलेले सुभाष वानखेडे नावाचे दोन उमेदवार, प्राचार्य डॉ. विठ्ठल कदम, शेख नईम शेख लाल, संतोष सगणे, उत्तम राठोड, घुमणर प्रकाश, देवजी गंगाराम असोले, बालासाहेब देशमुख, उत्तम धाबे, दिगांबर नाईकवाडे, आनंत भरोसे, आत्माराव राघोजी सातव, राजू शंकर सातव, अशोक सूर्यवंशी, सूरज विश्वनाथ कोंडावाड.

Story img Loader