Daily Petrol Diesel Price In Marathi : आज २१ जानेवारी २०२५ चे पेट्रोल व डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. मुंबईकरांना आज दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई शहरात मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Fuel Prices In Maharashtra) कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पण, महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात चढ-उतार दिसतो आहे. तर आज महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलचा भाव काय आहे खाली दिलेल्या तक्त्यातून तपासून घ्या…

महाराष्ट्रातील इंधनाचा दर (Fuel Prices In Maharashtra)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.३३९०.९६
अकोला१०४.३२९०.८८
अमरावती१०५.४७९१.९८
औरंगाबाद१०५.१८९१.२७
भंडारा१०४.७३९१.६०
बीड१०५.१०९१.३३
बुलढाणा१०४.४२९०.९७
चंद्रपूर१०४.१०९०.६८
धुळे१०४.५१९१.०४
गडचिरोली१०४.९० ९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०१
जळगाव१०५.५० ९२.०३
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.५६९१.१०
लातूर१०५.३८९१.८८
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.१३९०.६९
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.६६९१.१७
उस्मानाबाद१०४.८३९१.३६
पालघर१०३.७५९०.२६
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०४.०९९०.६०
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.०२९०.५९
सातारा१०४.४१९०.९३
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.३६९०.८८
ठाणे१०३.६४९०.१६
वर्धा१०४.७६९१.२९
वाशिम१०४.०५९१.१७
यवतमाळ१०४.८१९१.३६

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात आणि तुमच्यापर्यंत पोहचवतात. तर तुम्ही तक्त्यात पहिले असेल की, महाराष्ट्रातील काही शहरांत पेट्रोल व डिझेलचा भाव किंचित कमी झालेला दिसतो आहे. यामध्ये अहमदनगर, अकोला, भंडारा, बीड, बुलढाणा, गडचिरोली, नाशिक, परभणी, पालघर या शहरांचा समावेश आहे. तर काही ठिकाणी मात्र इंधनाचे दर स्थिर आहेत.

एसएमएसद्वारे जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर (Fuel Prices In Maharashtra) :

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाहीर करण्यात आल्या आहेत. कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींनुसार भारतात इंधनाची किंमत ठरवली जाते. तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

यामाहाची वाय / एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल :

२०२५ भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्ये यामाहाची एक खास वाय/एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल (Y/AI Concept Motorcycle) पाहायला मिळाली. यामाहाची वाय/ एआय कॉन्सेप्ट मोटरसायकल एआय आणि भविष्यासाठीचे डिझाइन करण्यात आली आहे. या मोटरसायकलमध्ये एआय तंत्रज्ञान आणि अद्ययावत डिझाइनचे संयोजन आहे. वायझेडआर-एम१ने प्रेरित डिझाइनसह ही कॉन्सेप्ट बाईक यामाहाच्या भविष्यातील मोबिलिटीचे दर्शन घडवते.

Story img Loader