वेगवेगळ्या राजकीय पक्षांतील २१ आजी-माजी आमदार माझ्या संपर्कात असून, लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी नागपूमध्ये पत्रकार परिषदेत केला. यामध्ये शिवसेनेच्या आमदारांचा समावेश नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चार माजी मनसे आमदार भाजपमध्ये
ते म्हणाले, २१ आजी-माजी आमदारांना पक्षात प्रवेश देण्यासाठी माझी पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाली आहे. लवकरच या सर्वजणांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र, यामध्ये शिवसेनेच्या आमदारांचा समावेश नाही. मित्रपक्षांचे आमदार फोडण्याचे काम आम्ही करीत नाही, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.
तंबू आणि नवे उंट..
राज्यात भाजपच्या नेतृत्त्वाखाली युतीचे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या पक्षांच्या माजी आमदारांनी या पक्षात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे वसंत गिते, प्रवीण दरेकर, रमेश पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील काही आमदारांनी भाजपत प्रवेश केला. या सर्व पार्श्वभूमीवर आता आणखी कोणते नेते भाजपत प्रवेश करणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा