अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने २१ वे नवोदित मराठी साहित्य संमेलनास उद्या (शनिवारी) सकाळी ११ वाजता येथील दयानंद महाविद्यालय सभागृहात प्रारंभ होत आहे.
सभागृहास लोकनेते विलासराव देशमुख साहित्यनगरी असे नाव दिले आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. दुपारी २ वाजता कथाकथन कार्यक्रमात अरुण गिरी, अंबादास केदार, प्रकाश घादगिने, काका िशदे, शिलवंत वाढवे आदी सहभागी होतील. सूत्रसंचालन प्रा. रामदास केदार करतील. बबन पोतदार व अनंत कदम यांची उपस्थिती, तर अध्यक्षस्थानी डॉ. भास्कर बडे आहेत. दुपारी ४ वाजता कविसंमेलनात शिवाजी चाळक, योगीराज माने, डॉ. वैशाली सावंत, बाबू डिसोझा, डॉ. शकील, रमेश सावंत, प्रकाश काळे आदींचा सहभाग, दशरथ यादव व विजय सातपुते यांचे सूत्रसंचालन व अध्यक्षस्थानी फ. म. शहाजिंदे आहेत.
महिलांवरील वाढत्या अत्याचाराला जबाबदार कोण? हा परिसंवाद सायंकाळी ६.३० वाजता होईल. कुमुदिनी भार्गव, प्राचार्या सीमा झोडगे, डॉ. किरण चिंते, पोलीस उपनिरीक्षक अनिता बोणे, प्राचार्य कुसुम मोरे, मोहन कारंडे यांचा सहभाग, संगीता काळभोर यांची उपस्थिती, सूत्रसंचालन डॉ. प्रीती पोहेकर यांचे व अध्यक्षस्थानी सांगलीच्या डॉ. जयश्री श्रेणीक पाटील आहेत. रात्री ८.३० वाजता मिर्झा बेग यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे. नारायण पुरी सूत्रसंचालन करतील. डॉ. जयश्री श्रेणीक पाटील यांची उपस्थिती, प्रा. तुकाराम पाटील, अमोल बागूल, अनुपमा मुंजे, शोभा शिराढोणकर आदी सहभागी होतील.
रविवारी (दि. २७) सकाळी ७.३० वाजता डॉ. सय्यद जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनाचे किशोर टिळेकर व विश्वनाथ गोसावी सूत्रसंचालन करतील. स्वाती ठकार, कविता तळेकर, साधना निकम, डॉ. रमा मराठे, डॉ. अर्चना माळी, शोभा जाधव आदी सहभागी होतील. ११ वाजता समाजप्रबोधनात संतसाहित्याचे योगदान या परिसंवादात इसहाक बिराजदार, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. डी. टी. पवार, डॉ. रतनलाल सोनग्रा, डॉ. सुरेखा आडगावकर यांचा सहभाग, पुरुषोत्तम खेडेकर आदींची उपस्थिती व अध्यक्षस्थानी डॉ. सदानंद मोरे आहेत. दुपारी १ वाजता नयन राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन, समाजपरिवर्तनात माध्यमांची भूमिका या विषयावर अनंत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास समारोप होईल. संमेलनास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा