सावंतवाडी :सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक २२.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ९.३ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ३२.०मि.मी. पाऊस झाला आहे. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड २ (१४.६), मालवण ११.२(१९.१), सावंतवाडी – २२.१(५३.०), वेंगुर्ला १३.३ (२३.४), कणकली ३.३ (३५.३), कुडाळ ११.९(२२.९), वैभववाडी०.८(८१.५), दोडामार्ग ७.४(३९.४), असा पाऊस झाला आहे.दरम्यान दुपारनंतर दमदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे व्यवसायिक, व्यापारी वर्गाची धावपळ उडाली तसेच शेतकऱ्यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत.
सावंतवाडी तालुक्यात २२.१ मि.मी. पाऊस
जिल्ह्यात सरासरी ९.३ मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी ३२.०मि.मी. पाऊस झाला आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 11-06-2022 at 02:05 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 1 mm rain recorded in sawantwadi taluka zws