वीस हजार रुपयांची लाच घेताना पकडलेला कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियांता गिरीशकुमार पारीख याच्याकडे २३ किलो सोने, २१ किलो चांदी यासह २३ लाख रुपये रोख आणि ठाणे-कल्याणमध्ये सदनिका व व्यापारी गाळे अशी अफाट मालमत्ता असल्याचे निदर्शनास आले आहे.
कर्जत तालुक्यातील एका रस्त्याच्या कडेला हॉटेलचा फलक लावण्याची परवानगी मिळण्यासाठी पारीख याने २० हजार रुपयांची लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने पारीखच्या विरोधात सापळा रचला. त्यात तो अलगद सापडला. त्यानंतर खात्याने केलेल्या चौकशीत पारीखकडे कोटय़वधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले. पारीखच्या नाशिक-कल्याण येथील तीन बँकांमधील खात्यांत नऊ लाख रुपयांच्या ठेवी असल्याचेही तपासात स्पष्ट झाले.

Story img Loader