पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या पार्शवभूमीवर आज पासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन २४ तास सुरु राहणार आहे. या काळात व्हीआयपी,ऑनलाईन दर्शन सेवा बंद ठेवली जाणार आहे.तसेच देवाचे नित्योपचार देखील बंद राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महारज औसेकर यांनी माहिती दिली  आहे. कार्तिकी  एकादशी २३नोव्हेबर रोजी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वारकरी सांप्रदायात आषाढी,कार्तिकी .माघी आणि चैत्री यात्रा महत्वाच्या मानल्या जातात. आषाढ ते कार्तिक या मराठी चार महिन्याच्या काळात अनेक महाराज पंढरीत मुक्कामी असतात. या चातुर्मासाची समाप्ती कार्तिकी यात्रेला होते. या यात्रेला प्रामुख्याने कोकण,पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा तसेच कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येने येतात. या पार्श्वभूमीवर  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने  श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे २४ तास दर्शनाची सोय केली आहे.

हेही वाचा >>>‘सुहागरात’ कारागृहात, दिवाळ सणाचा पाहुणचार सासरवाडीत..! 

गुरुवारी देवाची सायंकाळची धुपारती झाल्यावर म्हणजे साडे सातच्या दरम्यान देवाच्या पाठीला लोड लावण्यात आला. देवाचा पलंग काढून देवाचे नित्योपचार दि १ डिसेंबर पर्यंत बंद ठेवले आहेत अशी माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. कार्तिकी यात्रेसाठी येणार्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.मंदिर समितीने पदस्पर्श दर्शन रांगेतील भाविकांसाठी इतर सुविधेसह विश्रांती कक्ष उभारण्यात येणार आहे. चंद्रभागा नदीच्या पैलतीरावरील ६५ एकर येथे भाविकांच्या राहण्यासाठी तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती पालिकेचे मुख्याआधीकारी डॉ प्रशांत जाधव यांनी दिली आहे. असे असले तरी कार्तिकी यात्रेसाठी येणार्या भाविकांना दर्शन देण्यासाठी सावळा विठूराया आता २४ तास उपलब्ध झाला आहे. 

उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी

कार्तिकी यात्रेला राज्यासह कर्नाटकातून भाविक मोठ्या संख्यने येतो. यंदा ८ ते ९ लाख भाविक येतील असा अंदाज आहे. येथे आलेल्या भाविकांना देवाचे दर्शन आणि चंद्रभागा स्नान महत्वाचे मानले जाते. सध्या चंद्रभागा नदीचे पात्र कोरडे पडू लागले आहे. तर दुसरीकडे भाविक पंढरीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लवकरात लवकर पाणी सोडावे अशी मागणी होत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 hours darshan of vitoba of pandhari from today for kartiki yatra pandharpur amy