सावंतवाडी तालुक्यात २४२ कुपोषित मुले तपासणीत सापडून आली आहेत. त्याच्यासाठी पंचायत समितीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाणार आहे. त्याशिवाय विकलांग २१ मुलांवर उपचार सुरू असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
सावंतवाडी तालुका पंचायत समिती सभापती प्रमोद सावंत व उपसभापती महेश सारंग यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गटविकास अधिकारी महाजन, एस. पी. मोरे, डॉ. प्रशांत करीवळी, बालविकास अधिकारी मोहन भोई आदी उपस्थित होते.
सावंतवाडी तालुक्यात कुपोषणमुक्त अभियान या महिन्यात राबविले जाणार आहे. पंचायत समितीच्या पुढाकाराने काही सामाजिक संस्थांच्या भरतीतून हा उपक्रम राबवून २४२ कुपोषित मुलांची तज्ज्ञ डॉक्टरमार्फत तपासणी केली जाणार आहे, असे सांगण्यात आले. आरोग्य बालकल्याण विभागाअंतर्गत अंगणवाडी व बालवाडी सेविकामार्फत सात हजार ७८० मुलांची (शून्य ते ६ वयोगट) प्राथमिक तपासणी केली असता २४२ मुले कुपोषित वाटत असल्याने तज्ज्ञ डॉक्टरमार्फत तपासणी शिबिर घेऊन उपचार केले जाणार आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.
कुपोषित मुलांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी विशेष उपक्रम राबविला जात आहे. त्याशिवाय किशोरवयीन १६ ते २२ वर्षे वयोगटातील मुली व गरोदर मातांना, कुपोषित मुलांच्या पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. डॉक्टरांची पदे रिक्त असली तरी उपक्रम यशस्वीपणे राबवू, असे सभापती प्रमोद सावंत यांनी सांगितले. विकलांग २१ मुलांवर उपचार सुरू आहेत.
सावंतवाडीत २४२ कुपोषित मुले सापडली
सावंतवाडी तालुक्यात २४२ कुपोषित मुले तपासणीत सापडून आली आहेत. त्याच्यासाठी पंचायत समितीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले जाणार आहे.
First published on: 05-12-2014 at 05:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 242 children faces malnutrition in sawantwadi