महाराष्ट्रात २४३६ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ११८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात १५ हजार ७८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनामुळे झालेल्या मृत्यूंची राज्यातली संख्या ही १६९५ झाली आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ३५ हजार १७८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. १५ हजार ७८६ रुग्ण आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळून घरी गेले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ६० मृत्यू झाले आहेत त्यातले ३८ मुंबईत, ११ पुण्यात, ३ नवी मुंबईत, २ ठाण्यात, २ औरंगाबादमध्ये तर १ सोलापुरात झाला आहे. तसंच ६० मृत्यूंमध्ये ४२ पुरुष तर १८ महिला होत्या. यातले २७ जण हे ६० वर्षे आणि त्यावरील वयाचे होते. तर २९ जणांचे वय हे ४० ते ५९ इतके होते. तर तिघांचे वय ४० वर्षांपेक्षा कमी होते. जे ६० मृत्यू झाले आहेत त्यापैकी ४७ जणांना मधुमेह, हृदयरोग, ब्लड प्रेशर असे गंभीर आजार होते.

सध्याच्या घडीला ५ लाख ३० हजार २४७ जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे तर ३५ हजार ४७९ जणांना संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले आहे अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Story img Loader