सांगली : निर्बंधमुक्त वातावरणामध्ये तासगावचा २४३ वा रथोत्सव गुरूवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रींची पंचधातूची मुर्ती असलेला रथ  एक किलो   मीटर अंतरावरील काशीविश्‍वेश्‍वराच्या दर्शनाला निघाला त्यावेळी गणेश  भक्तांनी गुलाल, पेढ्यांची उधळण केली. यावेळी रथाचे सारथ्य मराठ्यांचे अखेरचे सेनापती परशुरामभाउ पटवर्धन यांचे वंशज राजेंद्र पटवर्धन यांनी केले.

या रथोत्सवास दारूबंदी व उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खा. संजयकाका पाटील, राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक  मान्यवर उपस्थित होते. रथोत्सवादिवशीच गणपती पंचायतन संस्थानच्या ऐतिहासीक दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होते. ’मंगलमूर्ती  मोरया, गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात, अलौकीक व नयनरम्य सोहळ्यात हा रथोत्सव पार पडला.  ’मंगलमुर्ती मोरया’ च्या जयघोषात भाविक गणरायाचा रथ दोरखंडाच्या सहाय्याने ओढतात.

Inquiry , Beed District Planning Committee, Beed ,
बीड जिल्हा नियोजन समितीच्या कामाची चौकशी, दोन वर्षांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Municipal administration unhappy with District Collector honoured by President after Municipal contribute for assembly elections
विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेची यंत्रणा, राष्ट्रपतीकडून सन्मान मात्र जिल्हाधिकाऱ्यांचा; पालिका प्रशासन नाराज
Uttarakhand UCC portal marriage registrations
Uttarakhand UCC: समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये विवाह नोंदणी कशापद्धतीने सुरू आहे?
flower festival held at byculla zoo
राणीच्या बागेतील पुष्पोत्सवात राष्ट्रीय प्रतीकांचा जागर; यंदा महापालिका वाघ, डॉल्फिन, कमळ, अशोकस्तंभ,
ugc dharmendra pradhan marathi nmews
अग्रलेख : प्रधान की सेवक?
शिवसेना शिंदे गटात मोठी फूट पडणार? उदय सामंत यांच्या नावाची का होत आहे चर्चा? (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : उदय सामंत हे एकनाथ शिंदेंना पर्याय ठरू शकतात का?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?

गणपती मंदिर ते समोर अर्धा किलोमिटरवर असलेल्या  काशिविश्‍वेश्‍वर मंदीरापर्यंत हा रथ ओढत नेला जातो. रथ ओढण्यास सुरवात झाल्यानंतर  गुलाल व पेढ्यांची झालेली उधळण, युवकांनी रथासमोर केलेले मानवी मनोरे, झांज पथक, समोर दिमाखात चालणारी गौरी’ हत्तीण यामुळे संपूर्ण वातावरण मंगलमय झाले होते.   करोनामुळे तब्बल दोन वर्षांचा खंड पडल्यानंतर यंदा तासगावात गणेशोत्सवाचा आणि रथोत्सव सोहळ्यात  मोठा उत्साह दिसून आला.

मराठा साम्राज्याचे शेवटचे सरसेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांनी इ. स.  १७७९ मध्ये तासगावच्या श्री सिद्धिविनायक गणपतीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून ही परंपरा अपवाद वगळता अखंड सुरू आहे.

Story img Loader