सांगली : सांगली लोकसभा मतदार संघात दाखल झालेल्या ३० पैकी ५ जणांचे उमेदवारी अर्ज शनिवारी झालेल्या छाननीत अवैध ठरले. उर्वरित २५ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले असून यामध्ये भाजपचे खा. संजयकाका पाटील, उबाठा शिवसेनेचे चंद्रहार पाटील व अपक्ष विशाल पाटील आदींचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे

टिपूसुलतान सिकंदर पटवेगार (बहुजन समाज पार्टी), आनंदा शंकर नालगे (बळीराजा पार्टी), पांडूरंग रावसाहेब भोसले (भारतीय जवान किसान पार्टी), महेश यशवंत खराडे (स्वाभिमानी पक्ष), सतिश ललीता कृष्णा कदम (हिंदुस्थान जनता पार्टी).

हेही वाचा…धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उमेदवारी अर्जावरील हरकत फेटाळली, प्रणिती शिंदे व सातपुतेंच्या अर्जांनाही हरकती

अपक्षामध्ये अजित धनाजी खंदारे, अल्लाउद्दीन हयातचाँद काजी, डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर, जालिंदर मच्छिंद्र ठोमके, तोहिद इलाई मोमीन, दत्तात्रय पंडीत पाटील, दिगंबर गणपत जाधव, नानासो बाळासो बंडगर, प्रकाश शिवाजीराव शेंडगे, प्रतिक प्रकाशबापू पाटील, बापू तानाजी सुर्यवंशी, रविंद्र चंदर सोलनकर, रेणुका प्रकाश शेंडगे, शशिकांत गौतम देशमुख, सुरेश तुकाराम टेंगळे, सुवर्णा सुधाकर गायकवाड, संग्राम राजाराम मोरे या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले.

हेही वाचा…‘हो, मी आदित्यला…’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ दाव्यावर फडणवीस स्पष्टच म्हणाले, “मला वेड…”

सोमवार दि. २२ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंय उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, छाननीनंतर रेणुका शेंडगे यांनी उमेदवारी मागे घेतली असून रिंगणात २४ जण उरले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 candidates validated for sangli lok sabha seat after nomination scrutiny 5 candidates form invalid psg