महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी मिळणार आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडय़ाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, प्राधिकरण स्थापन व्हावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. कळंबा तलाव सुशोभीकरणासाठी आराखडा तयार असून, सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून १० कोटी निधी प्राप्त झाला आहे. या कामांचा शुभारंभ येत्या १५ दिवसात होणार आहे. तसेच विभागीय क्रीडा संकुलाची ५० टक्के कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
गृहराज्यमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा विकास आराखडय़ाबाबत बठक झाली. बठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी महापौर सुनीता राऊत उपस्थित होते.
तीर्थक्षेत्राचा विकास आराखडय़ाबाबत बोलताना मंत्री पाटील म्हणाले, पहिल्या टप्प्यातील कामासाठी २५ कोटी निधी मिळणार आहे. यामध्ये मंदिराची विकासकामे करण्यात येणार आहेत. मंदिर परिसरातील रस्ते सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र विकासासाठी देवस्थान समिती व महानगरपालिकेचा हातभार लागणार आहे. मेन राजाराम हायस्कूल येथे पे आणि पाìकगची व्यवस्था असणार आहे. पहिल्या टप्प्यातील तीर्थक्षेत्र विकासकामात ज्या कामासाठी नागरिकांचा विरोध असणार नाही ती कामे जलदगतीने पूर्णत्वास करण्यात येणार आहेत. तसेच िबदूचौकातील पाìकग ठिकाणी लवकरच डांबरीकरण होणार आहे.
कळंबा तलाव सुशोभीकरणासाठी १० कोटी निधी पकी पहिल्या टप्प्याच्या कामात ८ कोटी निधी खर्च करण्यात येणार आहे. या कामांचा शुभारंभ १५ दिवसांत होणार आहे. सुशोभीकरणासाठी २६ एकर जागा असून यामध्ये दर्जेदार सुविधा नागरिकांना देणार आहे. कळंबा तलावाच्या उजव्या बाजूला रंकाळ्यासारखे कठडे बांधण्यात येणार आहे. सुसज्ज पाìकगसाठी विशेष प्रयत्न असणार असून, सुमारे दोन ते तीन हजार वाहने बसतील असे पाìकग करण्यात येणार आहे. हे पाìकग तलावाच्या पाठीमागे असणार आहे. २६ एकरामध्ये ४ एकर लॉन, ५ किमीचा सायकल ट्रॅक, सुसज्ज वॉकिंग ट्रॅक यासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कळंबा येथे दरवर्षी होणाऱ्या कुस्तीसाठी ग्रामस्थांना तलावाच्या पाठीमागे मिनी खासबाग मदान बांधण्यात येणार आहे. इंटरस्ट प्लाझा असणार आहे. सुशोभीकरणात २ कोटी ज्यादा घेऊन दोन बॅडिमटन हॉलचा समावेश असून, एक राजोपाध्यायनगर व एक राजारामपुरी येथे बनविण्यात आला आहे. यामध्ये बॉिक्सग िरगचा समावेश असल्याचेही पाटील यावेळी म्हणाले.
विभागीय क्रीडा संकुल कामाबाबत पाटील म्हणाले, प्राथमिक टप्यात १७ कोटींचा निधी होता. नंतर कामे वाढल्याने निधीत वाढ करून ७ कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. यामध्ये टेनिस कोर्ट, खो-खो, कबड्डी, बास्केटबॉलच्या मदानाची कामे पूर्ण झाली आहेत. शूटींग रेंजचे काम १५ दिवसांत पूर्ण होणार आहे. अॅथलेटीक्स, फुटबॉल मदानाची कामे १३ टक्के शिल्लक आहेत. उरलेल्या ७ कोटीत ४० मुले, ४० मुलीसाठी स्वतंत्र वसतिगृह बांधण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाणार आहे. पूर्ण झालेल्या कामांचा शुभारंभ क्रीडामंत्री यांच्या हस्ते होईल, अशी माहिती गृहराज्यमंत्री पाटील यांनी यावेळी दिली. यावेळी जिल्हाधिकारी राजाराम माने, मनपा आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, महापौर सुनीता राऊत, उपमहापौर मोहन गोंजारे, परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, जलअभियंता मनीष पवार यांच्यासह मनपा अधिकारी उपस्थित होते.
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी मिळणार – सतेज पाटील
महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी मिळणार आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडय़ाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला असून, प्राधिकरण स्थापन व्हावे यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. कळंबा तलाव सुशोभीकरणासाठी आराखडा तयार असून, सुशोभीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडून १० कोटी निधी प्राप्त झाला आहे.
First published on: 06-07-2014 at 02:45 IST
TOPICSकोल्हापूरKolhapurफंडFundमहालक्ष्मी मंदिरMahalaxmi TempleविकासDevelopmentसतेज पाटीलSatej Patil
+ 1 More
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 25 cr for mahalaxmi temple development satej patil