वाई : मांढरदेव (ता.वाई) येथून लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा टेम्पो पाचगणी येथे अवघड वळणावर उलटून २५ जण जखमी झाले. त्यातील चार जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर पाचगणी व महाबळेश्वर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालान (ता मांढरदेव) येथील आनंदा धोंडिबा धायगुडे यांच्या मुलाचा आज घोटेघर (ता.जावली) येथे दुपारी विवाह होता. त्यासाठी टेम्पो क्रमांक (एमएच ४३ यु ७८६०) मधून पंचवीस वऱ्हाडी वाई-पाचगणीमार्गे घोटेघरला जात होते. भरधाव टेम्पो घेऊन जात असताना पाचगणीच्या हद्दीत अवघड वळणाचा अंदाज न आल्याने व चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला खड्ड्यात आदळून उलटला.

SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Mumbai airport accident
मुंबई विमानतळावर आलिशान गाडीच्या अपघातात पाच जण जखमी
Accident
Accident : बाईकवर स्टंट करणाऱ्याला वाचवताना घात झाला, कारची ५ वेळा पलटी; कुंभमेळ्यावरून परतणारे ५ नेपाळी भाविक ठार
Satara , Mother, conspired, boyfriend, murder,
सातारा : आईने प्रियकरासोबत मुलाच्या हत्येचा रचलेला कट उधळला
35 people injured in an accident where st bus fell from bridge near Tandulwadi
एसटी बस पुलावरून कोसळून ३५ जण जखमी, इस्लामपूरजवळ महामार्गावर अपघात
Pune Mumbai Bangalore bypass road accident news update in marathi
भरधाव मोटार बसवर आदळून महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू
private school bus in Umarkhed accident near Palshi Fata on Saturday killing ninth grade student
भरधाव वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, चार जखमी; वाई बसस्थानकासमोर अपघात

हेही वाचा – शिंदेंवर पक्ष चोरीचा आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर सुधीर मुनगंटीवारांची उपरोधिक टीका, म्हणाले, “आम्ही राजकीय वाघांनाही…”

हेही वाचा – व्हीप कोण बजावणार? ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरणार का? राहुल नार्वेकरांची महत्त्वाची प्रतिक्रिया, म्हणाले, “माझ्याकडे असलेल्या नोंदीनुसार…”

अपघाताची माहिती मिळताच पाचगणी येथील आपत्कालीन संस्थेचे सदस्य, पालिका कर्मचारी व पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमींना पाचगणी येथील खाजगी रुग्णालयात, तर किरकोळ जखमींना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गाडीचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत असल्याने अपघात झाल्याचे टेम्पोतील वऱ्हाडींनी सांगितले. पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर.के कदम अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader