पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयात केवळ २५ टक्के साठा
रमेश पाटील, वाडा
३५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या वाडा शहरावर पाणीसंकट येऊ घातले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सिद्धेश्वर बंधाऱ्यात केवळ नावालाच पाणी उरले आहे.
वाडा शहराला दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धेश्वर बंधाऱ्यातून पाणीपुरवठा केला जातो. दररोज २५ लाख लिटर पाणी सध्या वाडा शहरासाठी सोडण्यात येते. वाडा शहराची नळपाणीपुरवठा योजना गेली १५ वर्षे जुनी आहे. नव्याने वाढलेल्या लोकवस्तीला पाणीपुरवठा करण्यात नगरपंचायतीला नाकीनऊ आले असतानाच आता जलाशयामधील पाणीसाठाच कमी झाल्याने वाडय़ातील रहिवाशांवर नवे संकट उभे ठाकले आहे.
वाडय़ाला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा नदीवरील सिद्धेश्वर बंधाऱ्यापासून पाचशे मीटर अंतरावर पालघर जिल्हा परिषदेच्या पाटबंधारा विभागाचा तेलखडक बंधारा आहे. या बंधाऱ्यामध्ये काही प्रमाणात पाणीसाठा असून तिथून पाणी सोडल्यास काही प्रमाणात पाणीपुरवठा होऊ शकेल. मुंबई महापालिका प्रशासनाकडे अथवा मुख्यमंत्र्यांना विनंती करून याच नदीवर असलेल्या अप्पर वैतरणा धरणातून काही प्रमाणात पाणी मिळाले तर पाणीसंकटावर मात करता येईल, असे वाडा नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते मनिष देहेरकर यांनी सांगितले.
वाडा परिसरात यंदा कमी पाऊस झाल्याने पाणीसंकट उभे ठाकले आहे. मात्र वेळीच सिद्धेश्वर बंधाऱ्याचे दरवाजे बंद केले असते तर ही वेळ आली नसती. मात्र येथील प्रशासनाने तत्परता दाखवली नाही, असा आरोप वाडय़ातील रहिवाशांनी केला आहे.
यंदा कमी पाऊस पडल्यामुळे ही वेळ आली आहे, तरी वाडय़ातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा गैरवापर करून नये.
– नयना चौधरी, सभापती, पाणीपुरवठा समिती, वाडा नगरपंचायत
संभाव्य पाण्याचे संकट लक्षात घेऊन त्यावर मात करण्यासाठी वाडा नगरपंचायतीचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
– प्रबोधन मोवाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, वाडा नगरपंचायत