तेलगीने रात्रीत एका बारमध्ये १ कोटी रूपये उधळल्याची माहिती होती. पण, मकाऊमध्ये महाराष्ट्रातील एक व्यक्ती कॅसिनोत साडेतीन कोटी डॉलर उधळतो. म्हणजे खऱ्या अर्थानं अच्छे दिल आलेत, असं म्हणत शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी ‘एक्स’ अकाउंटवर चंद्रशेखर बावनकुळे यांचे कॅसिनोतील फोटो ट्वीट केले होते. यानंतर मी कुटुंबाबरोबर असल्याचं बावनकुळेंनी स्पष्टीकरण दिलं होतं. अशातच संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळेंवर हल्लाबोल केला आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Navri Mile Hirlarla
Video : “आज मी सगळी गडबड…”, दु:खात असलेल्या लीलाला आली एजेची आठवण; मालिकेत येणार ट्विस्ट, पाहा प्रोमो
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?

हेही वाचा : संजय राऊतांकडून कॅसिनोतील ‘तो’ फोटो ट्वीट, बावनकुळे प्रत्युत्तर देत म्हणाले, “मी मकाऊ येथे…”

“कुटुंबाबरोबर असल्याचं सांगितलं जात आहे, मग…”

संजय राऊत म्हणाले, “मी कुणाच्याही व्यक्तीगत आनंदावर विरजण घालू इच्छित नाही. पण, महाराष्ट्रात सामाजिक परिस्थिती काय आहे? आम्ही एखादी गोष्ट समोर आणल्यानंतर ट्रोलधाडीनं काहीतरी सांगायचं. मात्र, आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. कुटुंबाबरोबर असल्याचं सांगितलं जात आहे. मग, फोटोत चिनी कुटुंब आहे का? जेवढे खोटे बोलाल, तेवढे फसाल.”

“मी भाजपाचं दुकान बंद करणार नाही, कारण..”

“माझ्याकडे २७ फोटो आणि ५ व्हिडीओ आहेत. मात्र, आमच्यात माणुसकी आहे. २७ फोटो आणि व्हिडीओ समोर आणले, तर भाजपाला दुकान बंद करावे लागेल. पण, मी ते करणार नाही. कारण, हे दुकान २०२४ पर्यंत चाललं पाहिजे,” असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

हेही वाचा : “महाराष्ट्र पेटलाय अन् हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत…”, बावनकुळेंचा ‘तो’ फोटो ट्वीट करत राऊतांचा हल्लाबोल

“आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय”

“मी कधी कुणावरही व्यक्तीगत टिप्पणी करत नाही. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार आहेत. तुमच्याकडे महाराष्ट्रात ईडी आणि सीबीआय असेल. आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय आहे,” असेही संजय राऊतांनी म्हटलं.

Story img Loader