वनविभाग लवकरच कारवाईचे आदेश काढणार
पोपटा पोपटा बोलतोस गोड.. म्हणत घरातील पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवलेल्या हजारो पोपटांची सुटका करण्यासाठी वन विभागाने आता कठोर पावले उचलली आहेत. माणसांच्या हौशीखातर आयुष्यभर पिंजऱ्यात फडफडणारे पोपट मिठू मिठू करत मरून जातात. पोपटांची पिल्ले पकडून त्यांची विक्री करणाऱ्यांचे रॅकेटही मोठे आहे. या पाश्र्वभूमीवर पोपट पाळणाऱ्यांना २५ हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय वनविभागाने घेतला असून याबाबत लवकरच आदेश काढण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वन्यजीव संरक्षण संस्थांनी वारंवार आक्षेप घेतल्यानंतरही घरी चोरून-लपून पोपट पाळले जात आहेत. त्यामुळे पोपटाचा स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेणाऱ्यांना आता लगाम लावण्याचे वनविभागाने ठरविले असून वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. ‘पाळलेला पोपट पिंजऱ्यातून मुक्त करा किंवा २५ हजार रुपये दंड भरण्याची तयारी ठेवा’ असा आदेश लवकरच जारी केला जाणार आहे.

सूचीबद्ध प्राणी आणि पक्ष्यांना घरात पाळण्यापूर्वी वन विभागाची परवानगी अनिवार्य आहे. परंतु, पोपट पाळण्यासाठी वन विभागाने परवानगी दिलेली नाही. पोपट हा पक्षी राष्ट्रीय संपत्ती असून त्याला मुक्त संचाराचा हक्क आहे. त्याचे आयुष्य पिंजऱ्यात बंद करणे हा कठोर गुन्हा असल्याने पोपटाला पिंजऱ्यात ठेवणाऱ्यांविरुद्ध वन विभागाने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे, असे नागपूरचे मानद वनसंरक्षक कुंदन हाती यांनी सांगितले.