Petrol Diesel Rate In Maharashtra : आज महाराष्ट्रातील २६ फेब्रुवारी २०२५ चे पेट्रोल डिझेलचे दर जाहीर झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमतीत दिवसेंदिवस चढ-उतार पाहायला मिळाला आहे. कारण – व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादीवर अवलंबून पेट्रोल व डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलत असतात. तर आज पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) कामी झाले आहेत किंवा वाढले आहेत या लेखातून सविस्तर जाऊन घेऊ.

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Rate In Marathi)

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.३०९०.८३
अकोला१०४.१८९०.७४
अमरावती१०४.८९९१.४२
औरंगाबाद१०५.१८९१.६८
भंडारा१०४.८१९२.०३
बीड१०५.५०९२.०३
बुलढाणा१०५.५०९२.०३
चंद्रपूर१०४.९२९१.४७
धुळे१०४.५७९१.१०
गडचिरोली१०५.४९९२.००
गोंदिया१०५.३९९१.९०
हिंगोली१०५.४१९१.९२
जळगाव१०५.५०९२.०२
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.०३९०.६०
लातूर१०५.२५९१.७६
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.५८९१.१३
नांदेड१०५.४९९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.२२९०.७५
उस्मानाबाद१०५.०६९१.५८
पालघर१०४.०३९०.५४
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.०८९०.६१
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.७५९१.२८
सातारा१०५.३२९१.८१
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७६९१.३०
ठाणे१०३.८०९०.३१
वर्धा१०४.९५९१.४८
वाशिम१०४.८९९१.४२
यवतमाळ१०५.३७९१.८९

आजच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पाहता महाराष्ट्रातील काही शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर काही शहरांतील नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. तर काही ठिकाणी दर अगदीच स्थिर दिसून आले आहेत. तसेच मुंबईत मात्र अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणताही बदल झालेला अद्याप दिसून आलेला नाही. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुम्हीसुद्धा पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate) नक्की एकदा वर दिलेल्या तक्त्यातून तपासून घ्या.

तेल कंपन्या दररोज आढावा घेतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत दरवाढ करत असतात.
देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कंपन्यांकडून इंधनाच्या किंमती सकाळी सहा वाजता जारी केल्या जातात. तसेच महाराष्ट्रातील काही शहरात आज पेट्रोल व डिझेलचे दर कमी झाल्याचे दिसून आले आहे.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर :

यासाठी तुम्ही इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक ९२२३११२२२२ या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.

CNG कार खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज!

रेनॉल्ट कंपनी त्यांच्या क्विड (Kwid), ट्रायबर (Triber) व किगर (Kiger) या तीन गाड्यांवर सीएनजी किट (CNG Kits) देणार आहे. हे सीएनजी रेट्रो किट्स सुरुवातीला भारतातील हरियाणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात व महाराष्ट्र या पाच राज्यांमध्ये आणि टप्प्याटप्प्याने इतर राज्यांमध्येसुद्धा उपलब्ध करून दिले जातील. तसेच कंपनीचे म्हणणे आहे की, हे किट्स तीन वर्षांच्या वॉरंटीसह देण्यात येणार आहेत.

Story img Loader