डेंग्यूसदृश आजाराने शहरातील एका बालकाचा मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, महिनाभरात या आजाराची सुमारे २६ रुग्णांना त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातील २४ रुग्ण हे शहरातील असून उर्वरित दोन जण ग्रामीण भागातील आहेत.
यातील काही रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी गंजमाळ परिसरात वास्तव्यास असलेल्या एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्याला डेंग्यूची लागण झाल्याचे प्राथमिक निदान जिल्हा रुग्णालयाने केले असले तरी पालिकेच्या आरोग्य विभागाने त्यास नकार दिला होता.
शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल असलेल्या ७२ जणांचे नमुने आरोग्य विभागाने पुणे येथील विषाणुजन्य प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील २६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यातील काही रुग्णांवर उपचार होऊन त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. डी. बी. पाटील यांनी दिली. काही रुग्णांवर पालिकेसह इतर काही रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा