सांगली : नागठाणे (ता. पलूस) येथील महादेव शिंदे यांच्या शेतात मेंढ्यांच्या कळपावर अज्ञात प्राण्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ मेंढ्या ठार झाल्या. तसेच या हल्ल्यात एक कुत्राही ठार झाला. ही घटना मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची नव्याने जुळवाजुळव, नव्या नेतृत्वाला संधी

मेंढपाळ आपल्या मेंढ्यासह गेल्या चार दिवसांपासून वास्तवास आहेत. त्यांच्या समवेत कळपात जवळपास ४५० मेंढ्या होत्या. मंगळवारी रात्री अज्ञात प्राण्याने कळपावार हल्ला केला. या हल्ल्यात २६ मेंढ्या व एक राखणदार कुत्रा ठार करण्यात आला आहे. अज्ञात प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. घटनेची कल्पना वनविभाला देण्यात आली असून घटनास्थळी पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच व तलाठी यांनी भेट दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 26 sheep attacked by unknown animals in nagthane ssb
Show comments