लोकसत्ता वार्ताहर

अकोले : मुळा भंडारदरा धरणांचे पाणलोट क्षेत्रात धो धो पाऊस कोसळला. भंडारदरा पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे चोवीस तासात २६० मिमी पावसाची नोंद झाली.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
weather department, Cold weather
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा….१५ नोव्हेंबरनंतर मात्र….
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच

कळसुबाई रतनगडाच्या पर्वत रांगेतील १२२ चौरस किलोमीटर भंडारदरा धरणाचे पाणलोट क्षेत्र आहे.पावसाळ्यात पाच हजार मिमी पर्यंत पाऊस येथे पडतो .शनिवार सकाळ पासून या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज सकाळ पर्यंतच्या चोवीस तासात भंडारदरा येथे १९५ मिमी तर पाणलोट क्षेत्रात रतनवाडी २२१ मिमी,पांजरे १३३ मिमी व घाटघर २६० मिमी पाऊस पडला. या पावसामुळे भंडारदरा धरणात पाण्याची मोठया प्रमाणात आवक झाली. ११ हजार ३९ दशलक्ष घनफुट क्षमतेचे भंडारदरा धरण पूर्ण भरलेले आहे.

धरणाची पूर्ण साठा संचय पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून काल पासून प्रवरा नदी पात्रात मोठया प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे.चोवीस तासात धरणातून ८९७ दलघफु पाणी सोडण्यात आले.धरणात होणारी पाण्याची आवक कमी झाल्यामुळे भंडारदरा धरणातून सुरू असणारा विसर्ग आज सकाळी १० हजार १६२ क्यूसेक पर्यंत कमी करण्यात आला होता.सकाळी धरणाचा पाणी साठा १० हजार ९२२ दलघफु (९८.९४ टक्के) होता.

आणखी वाचा-Ladki Bahin Yojana : “३१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरलेल्या महिलांना…”, लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीसांचं विधान चर्चेत

भंडारदरा धरणातून सोडलेले पाणी निळवंडे धरणात जमा होते.पाणी पातळी नियंत्रणासाठी निळवंडे धरणातूनही काल पासून मोठया प्रमाणात प्रवरा नदीत पाणी सोडले जात आहे.सकाळ पर्यंतच्या चोवीस तासात निळवंडे धरणातून ८९३ दलघफु पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले.आज सकाळी निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सुरू असणारा विसर्ग १३ हजार ६० क्यूसेक तर धरणातील पाणी साठा ७ हजार ६५५ दलघफु(९१.९२ टक्के) होता.विसर्ग कमी केल्यामुळे प्रवरा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे. मुळा धरणातून १५ हजार क्यूसेक विसर्ग मुळा धरणातील पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी मुळा धरणातूनही सांडव्याद्वारे काल पासून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली .आज सकाळी मुळा धरणातून १५ हजार क्यूसेक ने विसर्ग मुळा नदी पात्रात सुरू होता.

मुळा धरणाची साठवण क्षमता २६ हजार दशलक्ष घनफुट एव्हडी आहे.धरणाच्या जलाशय परिचालन सुचिनुसार १६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत धरणातील पाणी साठा २४ हजार २४१ दलघफू ते २४ हजार ८८४ दलघफू इतका नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे.त्या नुसार काल सकाळी नऊ वाजता मुळा धरणातून एक हजार क्यूसेकने नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला होता.दुपारी बारा वाजता हा विसर्ग वाढवून दोन हजार क्यूसेक करण्यात आला.मात्र धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे रात्री मुळा नदी पत्रातील विसर्ग वाढवून आधी १० हजार क्यूसेक तर नंतर १५ हजार क्यूसेक करण्यात आला.

आणखी वाचा-Maharashtra Rain News: रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट; जाणून घ्या राज्यात कुठे किती पडणार पाऊस…

आज सकाळी मुळा धरणाचा पाणी साठा २४ हजार ८४० दलघफु(९५.५३ टक्के)होता.आणि धरणातून १५ हजार क्यूसेक विसर्ग सुरू होता.तर धरणात ७ हजार ३१० क्यूसेक ने पाण्याची आवक सुरू होती. १०६० दलघफु क्षमतेचे तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण पूर्ण भरले असून सकाळी धरणाच्या सांडव्यावरून १ हजार ८१३ क्यूसेक पाणी आढळा नदी पात्रात पडत होते. तर भोजपुर येथील म्हाळुंगी नदीवरील धरणातून २ हजार ८०० क्यूसेक विसर्ग सुरू होता. या सर्व नद्यांचे पाणी जायकवाडी धरणात जाते. आज सकाळपासून पाऊस उघडला आहे