लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोलापूर : बार्शी तालुक्यातील तुर्क पिंपरी येथे एका शेतकऱ्याच्या घरी, जनावरांच्या गोठ्यात पिंपामध्ये साठवून ठेवलेले पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पाच शेळ्या सुदैवाने बचावल्या.
संतोष भगवान शेळके या पीडित शेतकऱ्याने याबाबत बार्शी पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी संतोष शेळके यांनी गावच्या शिवारातील आपल्या शेतात नेहमीप्रमाणे आपल्या ३२ शेळ्या चारण्यासाठी नेल्या होत्या. नंतर तेथून शेजारच्या तुरीचे पीक काढलेल्या शेतात शेळ्या नेल्या होत्या. काही वेळानंतर पाणी पाजण्यासाठी शेळके यांनी सर्व शेळ्या स्वतःच्या गोठ्याजवळ आणल्या. तेथे पिंपात साठविलेले पाणी प्यायल्यानंतर ३२ पैकी २७ शेळ्यांच्या तोंडातून फेस आला आणि काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला.
आणखी वाचा-महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा मधाचे गाव ‘मांघर’वर! प्रजासत्ताक दिन भारत पर्व प्रदर्शनात सहभागी होणार
बार्शी तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांची न्यायवैद्यक तपासणी झाल्यानंतर या घटनेचे निश्चित कारण समजू शकेल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.