हिंदुजा उद्योग समूहातील ‘इंडसइंड’ या फायनान्स कंपनीचे पोलीस मुख्यालयालगतच असलेले कार्यालय रात्रीच्या वेळी फोडून चोरटय़ांनी सुमारे २८ लाख १६ हजार रुपयांची रोकड पळवली. रात्री घडलेल्या या घटनेची सायंकाळपर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती. नगर शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चोऱ्या, घरफोडय़ा वाढल्या आहेत.
सर्जेपुरा चौकातील होंडा कंपनीचे विक्रेते असलेल्या ‘साईदीप’ शोरूम इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर इंडसइंड कंपनीचे कार्यालय आहे. वाहनांच्या कर्जदारांना परतफेडीचा भरणा करण्यासाठी कंपनीने दरमहा ७ व २१ अशा दोन तारखा ठरवून दिल्या आहेत. त्यामुळे काल भरणा करण्यासाठी गर्दी होती, कार्यालयात मोठी रक्कम जमा झाली होती. जमा झालेली रक्कम कंपनीच्या तिजोरीत ठेवून कर्मचारी रात्री नऊ वाजता घरी गेले. त्यानंतर रोखपाल आदिनाथ आढाव यांनी तिजोरीच्या चाव्या त्यांच्या ड्रॉवरमध्येच ठेवल्या होत्या. सकाळी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या कार्यालयाच्या दरवाजाचा कोयंडा तोडलेला आढळला, रोखपालाच्या ड्रॉवरचे कुलूप बनावट चावीने उघडलेले होते, त्याला बनावट किल्ली तशीच लटकलेली होती व तिजोरीतील रक्कम गायब होती.
फायनान्स कंपनीच्या तिजोरीतून २८ लाख लंपास
हिंदुजा उद्योग समूहातील ‘इंडसइंड’ या फायनान्स कंपनीचे पोलीस मुख्यालयालगतच असलेले कार्यालय रात्रीच्या वेळी फोडून चोरटय़ांनी सुमारे २८ लाख १६ हजार रुपयांची रोकड पळवली. रात्री घडलेल्या या घटनेची सायंकाळपर्यंत तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.
First published on: 23-12-2012 at 02:52 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 28 lakh rupee looted by robber of finance company