लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील अकरापैकी आठ जागांसाठी गुरुपुष्यामृताचा मुहूर्त साधून २८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. भाजपचे आमदार सुभाष देशमुख (सोलापूर दक्षिण), शिवसेनेचे (ठाकरे) माजी मंत्री दिलीप सोपल (बार्शी), राष्ट्रवादी पक्षाचे (शरद पवार) माजी आमदार नारायण पाटील (करमाळा), याच पक्षाचे भगीरथ भालके (पंढरपूर-मंगळवेढा), राष्ट्रवादीचे (अजित पवार) आमदार यशवंत माने (मोहोळ) आदींनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या उमेदवारीचा तिढा कायम असलेल्या माढा मतदारसंघातून ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. मात्र, अर्ज भरलेल्या बहुसंख्य उमेदवारांनी पक्षाचा एबी फॉर्म जोडला नसल्याचे दिसून आले.
करमाळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुरस्कृत अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अजित पवार यांची साथ सोडून अपक्ष उमेदवारीचा निर्णय घेतला आहे. त्यांचे विरोधक असलेले मोहिते-पाटील समर्थक माजी आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने यापूर्वीच घोषित केली आहे. त्यानुसार त्यांनी अर्ज दाखल केला आहे. माढ्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी कोणाला मिळणार याची उत्सुकता कायम आहे.
आणखी वाचा-शरद पवारांनी मराठा समाजाला आरक्षण न देता प्रश्न चिघळवला, शिवेंद्रसिंहराजे यांचे टीकास्त्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील निष्ठा खुंटीला टांगून शरद पवार गटाकडून आपले पुत्र रणजितसिंह शिंदे यांना उमेदवारी येण्यासाठी ज्येष्ठ आमदार बबनराव शिंदे यांनी मोठा आटापिटा चालविला आहे. परंतु त्यांना त्यांचे कट्टर विरोधक, ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील त्यांचा पुतण्या खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा कडवा विरोध आहे. या संदर्भात उमेदवारीचा तिढा सोडविताना मोहिते-पाटील यांची भूमिका महत्त्वाची मानली जात असतानाच रणजितसिंह शिंदे यांनी पक्षाची उमेदवारी गृहीत धरून अर्ज दाखल केला आहे.
सोलापूर दक्षिणमधून सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी अर्ज दाखल केला. त्यांनीही एबी फॉर्म जोडला नव्हता.