छत्रपती संभाजीनगर : बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी सायंकाळी एका २८ वर्षाच्या तरुणाचा खून करण्यात आला. मृत तरुणाचा सहा महिन्यापूर्वी साक्षगंध (साखरपुडा) झाला असून, येत्या 15 डिसेंबरला लग्न नियोजित होते. दिनेश उर्फ बबलू परमानंद मोरे, असे खून झालेल्या तरुणाचे नाव, असून घटना जुन्या वादातून घडल्याची प्राथमिक माहिती असल्याचे बेगमपुरा ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा…Girish Mahajan : सत्तास्थापनेचा तिढा सुटला? गिरीश महाजनांची एकनाथ शिंदेंसोबत सव्वा तास चर्चा; भेटीनंतर म्हणाले, “महायुतीत सगळं…”

हर्सूल मध्यवर्ती कारागृहासमोरील चेतनानगर परिसरातील एन-13 येथील मैदानावर ही घडली. घटनास्थळी रॉड, हातातील चांदीची साखळी आढळली असून, पोलिसांनी पंचनामा करून, तपासाच्या दृष्टीने चक्रे फिरवली आहेत. बबलू उर्फ दिनेशला सहा महिन्यांपूर्वी झालेला वाद मिटवायचे कारण देत निर्जनस्थळी बोलावून घेतले व 8 ते 10 जणांनी चाकू व बॅटने जीवघेणा हल्ला केला त्यानंतर बबलू रक्ताच्या थारोळ्यात पडला तेथील नागरिकांनी उपचारासाठी घाटी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेत त्याच्यासोबत असलेला सुमित चव्हाण देखील गंभीर जखमी झाला आहे. बबलूचा खून झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मित्र परिवाराने घाटीत गर्दी केली.