जिल्हा परिषदेत सदस्यांना अंधारात ठेवून रस्त्यांची कामे देण्यात आली. मात्र, कामे न करताच बिले उचलली गेली, असा गंभीर आरोप भाजप गटनेते रामचंद्र तिरुके यांनी सर्वसाधारण सभेत केला. या प्रकरणात तब्बल साडेतीन कोटींचा गरव्यवहार झाला असल्याचे त्यांचे म्हणणे होते.
जि.प.त सदस्यांना अंधारात ठेवून तब्बल ६२ कामे करण्यात आली. यातील १५ कामे १५ लाख रुपयांची, तर ४७ कामे ५ लाख रुपयांची होती. एखाद्या कामाचे तुकडे करून ५ लाखांची कामे कोणाच्या फायद्यासाठी दिली गेली, असा प्रश्नही तिरुके यांनी उपस्थित केला. दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या बाभळगावात तब्बल ११ कामे झाल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसत असल्याचे तिरुके म्हणाले. तिरुके यांनी रस्ते विकासाच्या कामाची यादी मागितली. त्यांना १०८ कामांची यादी देण्यात आली, तर अर्थ विभागाने १७० कामे झाली असून त्यांची बिलेही उचलण्यात आल्याचे लेखी दिले.
हा विषय सभागृहात चच्रेला येऊ नये, या साठी अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना उपाध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांनी खो घातल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत दलितवस्तीशिवाय अन्यत्र कामे झाल्याचे अध्यक्ष बनसोडे यांनी मान्य केले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सूचना देऊनही अशी कामे करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका बनसोडे यांनीच घेतली.
जि.प.त ५८ सदस्य निवडून आले. मात्र, सर्वसाधारण सभेत १० तालुक्यांच्या पंचायत समिती सभापतींनाही बठकीस बसता येते. जि.प. सदस्यांसाठीचा निधी पंचायत समित्यांनाही मिळावा, अशी भूमिका पंचायत समिती सभापतींनी घेतली. मात्र, यावर तातडीने अध्यक्षांनी भूमिका न मांडल्यामुळे सर्वच सभापतींनी सभात्याग केला. जि.प.त सुरू असलेल्या कामधेनू दत्तकग्राम योजनेची चौकशी व्हावी, अशी मागणीही बठकीत करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा