सावंतवाडी : डंपरखाली चिरडून ३ वर्षीय मुलगी ठार झाली. तिचा मृतदेह दफन करण्यात आला होता, आणि तब्बल १९ दिवसांनी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन तो उकरून काढला. चिरेखाणीत काम करणाऱ्या छत्तीसगड येथील कुटुंबाने आपल्या मुलीला गमावले. मात्र हे प्रकरण दडपण्याच्या इराद्याने डंपर चालक व मालक यांनी मृतदेह दफन केला, पण शेवटी पोलिसांना सत्य उघड करण्यात यश आले.

सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड – गुळदूवे सतीटेंब येथील चिरेखाणीवर ५ ऑगस्ट रोजी जांभा दगडाने भरलेला डंपर पलटी झाला. त्यातील दगड ३ वर्षीय मुलीवर पडले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. यानंतर त्या मुलीचा मृतदेह शेजारच्या माळरानावर दफन करण्यात आला होता. याबाबत गावात चर्चा होती, पण सर्वच जण गप्प होते.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
One died in an accident, accident Ovala Naka,
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू, ओवळा नाका येथील घटना
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

हेही वाचा…Maharashtra Bandh : मोठी बातमी! मविआचा उद्याचा ‘महाराष्ट्र बंद’ मागे; शरद पवार, नाना पटोलेंनंतर उद्धव ठाकरेंकडूही भूमिका स्पष्ट

१९ दिवसांनी दफन प्रकरण उघडकीस

चिरेखाणीत तीन वर्षांच्या मुलीचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांना मिळताच, त्यांनी प्राथमिक चौकशी केली आणि त्यात माहितीची पुष्टी झाली. त्यांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्याची परवानगी न्यायालयाकडे मागितली. सावंतवाडी येथील न्यायालयाने परवानगी दिली. त्यानंतर छत्तीसगड येथील मुलीचे वडील श्री. ब्रिजराज दास यांना बोलावून घेतले.

न्यायालयाच्या परवानगीने मृतदेह बाहेर काढला

न्यायालयाच्या परवानगीने दफन केलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी मळेवाड – गुळदूवे सतीटेंब येथे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण, नायब तहसीलदार मनोज मुसळे, वैद्यकीय अधिकारी, पोलिस पाटील दिगंबर मसुरकर, दोन महिला पंच आणि मृत मुलीचे वडील श्री. ब्रिजराज दास घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा…लातूरच्या अल्पवयीन मुलीस जन्मदात्या आईनेच विकून लग्न लावले, माढ्यातील धक्कादायक प्रकार

शवविच्छेदन कोल्हापूर वैद्यकीय रुग्णालयात

आज दफन केलेला तीन वर्षांच्या मुलीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन झाल्यानंतर अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

चिरेखाणीत काम करणाऱ्या श्री. ब्रिजराज दास यांच्या तीन वर्षांच्या मुलीचा डंपर पलटी झाल्यामुळे मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेची माहिती पोलिसांना किंवा पोलिस पाटलांना देण्यात आली नव्हती. लहानग्या मुलीला गमावले असूनही तिचा मृतदेह जवळच्या माळरानावर दफन करण्यात आला. हे सगळं घडल्यानंतर तिच्या आई-वडिलांना गावी पाठवण्यात आले. मात्र १९ दिवसांनी हा दुर्दैवी प्रसंग समोर आला. बदलापूर येथील घटनेमुळे पोलिसांनी तात्काळ अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तातडीने पाऊल उचलले आहे.

हेही वाचा…Crime News : महाराष्ट्रात चाललंय तरी काय? बदलापूर, मुंबई अकोल्यासह मुलींवर अत्याचाराच्या मन सून्न करणाऱ्या घटना

सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

या प्रकरणी लहानग्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर प्रकरण दडपण्याच्या इराद्याने मृतदेह दफन केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलगी ठार झाल्यानंतर पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे दुर्दैवी आहे.

हेही वाचा…Maharashtra Bandh : ‘उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घ्या’, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवारांचं आवाहन

गुन्हा करणाऱ्यांना अटक होणार?

या तीन वर्षांच्या मुलीच्या दफन प्रकरणात डंपर चालक, मालक, जेसीबी चालक, चिरेखाण मालक यांची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय माहिती लपवून ठेवली, मृतदेह दफन करण्यास मदत केली, म्हणून तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, न्यायालयाच्या परवानगीने दफन केलेला मृतदेह सापडला आहे. आता कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या वैद्यकीय अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल.