‘बजाज हेल्थ केअर’ कंपनीत दुर्घटना; कामगारांमध्ये अल्पवयीन मुले

बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात घातक वायूची डोळ्यांशी संपर्क आल्याने सुमारे ३०कामगार अस्वस्थ वाटू लागले. बोईसरमधील तीन खासगी रुग्णालयात कामगारांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर गुप्तता पाळण्यात आली होती. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली परंतु त्याची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नव्हती.

औद्य्ोगिक क्षेत्रातील प्लाट १७८ येथील ‘बजाज हेल्थ केअर’ या औषध कारखान्यांत नवीन पदार्थावर प्रयोग सुरू असताना वायूचा कामगारांच्या डोळयांशी संपर्क आला. त्यानंतर त्यांचे डोळे दुखू लागले. सिटीक अनहायड्राइट या वायूचा डोळ्यांसी संपर्क आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे डोळ्यांना जळजळ, दुखणे, त्वचेला जळजळ होऊ लागली.

रविवारी कामगारांना अधिक त्रास होऊ  लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तारापुर औद्य्ोगिक क्षेत्रात अनेक कारखान्यात उत्पादनावर रासायनिक प्रयोग केले जातात. त्याची माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाला दिली जात नसल्याचे उघड झाले आहे.

अल्पवयीन कामगार

बजाज हेल्थ केअर कारखान्यात वायुची बाधा झालेल्या कामगारांन मध्ये तिन कामगार हे अल्पवयीन असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे रासायनिक कारखान्यात अल्पवयीन मुलांना राबवून घेत असल्याचे दिसून आले आहे.

काम सुरू असताना व्हॉल्वमधून गळती झाल्याने कामगारांना त्याची बाधा झाली. डोळ्यांत जळजळ होत असल्याने कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

-आर. सी पाटील, (व्यवस्थापन) बजाज हेल्थ केअर तारापूर