Petrol And Diesel Prices In Maharashtra : आज ३१ मार्च २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. आज मार्च महिन्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या १ तारखेला पेट्रोल-डिझेल, सोने-चांदी आणि सिलेंडरच्या भाव वाढणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहील. पण, आज इंधनाचा भाव वाढला आहे की कमी झाला? तुमच्या शहरांत एक लिटर इंधनाची किंमत किती आहे याबद्दल आपण जाणून घेऊया…

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol Diesel Price In Marathi ) :

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.४५९०.८७
अकोला१०४.११९१.०२
अमरावती१०४.८४९१.३२
औरंगाबाद१०५.३३९१.३७
भंडारा१०४.५३९१.४१
बीड१०५.५०९१.३४
बुलढाणा१०५.३८९०.९७
चंद्रपूर१०४.४६९१.४७
धुळे१०४.०२९१.२९
गडचिरोली१०५.००९१.४४
गोंदिया१०५.५५९२.०९
हिंगोली१०५.४०९२.०३
जळगाव१०४.५०९०.९४
जालना१०५.५४९२.०३
कोल्हापूर१०४.४१९१.०४
लातूर१०५.१७९२.०३
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.०९९०.५८
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०५.४९९१.९८
नाशिक१०४.३४९१.२५
उस्मानाबाद१०४.२१९१.२३
पालघर१०४.७३९१.०१
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.०४९०.३५
रायगड१०४.१२९१.२६
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.११९१.०१
सातारा१०४.८८९१.६५
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.७८९०.९१
ठाणे१०३.६८९०.२२
वर्धा१०४.१७९०.९४
वाशिम१०४.७४९१.२८
यवतमाळ१०५.५०९१.०३

पेट्रोल-डिझेलचे दर जागतिक कच्या तेलाच्या किंमतीच्या आधारे केला जातो. या दरांमध्ये कर (व्हॅट), मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर आदी विविध शुल्कांचा समावेश असतो. यानुसार प्रत्येक शहरांत पेट्रोल-डिझेलचे दर वेगवेगळे असतात.

तुम्हाला जर दररोज तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घ्यायचे असल्यास ते कसे मिळवावे हे सुद्धा जाणून घ्या… दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होत असतात, त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलची नवीन किंमत सकाळी ६ वाजता जाहीर केली जाते. त्यामुळे तुम्हाला जर याचे रोजचे भाव जाणून घ्यायचे असतील तर, तुम्ही घरी बसलेल्या SMSद्वारे जवळच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईल ग्राहक RSP समवेत सिटी कोड वापरुन त्यांच्या मोबाईलवरून 9224992249 वर मॅसेज पाठवावा.

नवीन अवतारात MG ची ब्लॉकबस्टर SUV लाँच!

MG ने त्यांच्या नवीन ॲस्टरला “ब्लॉकबस्टर एसयूव्ही” असे नाव दिले आहे. तर ॲस्टरची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून १७.५६ लाख रुपयांपर्यंत आहे.नवीन अवतारात अ‍ॅस्टरला एक अपडेटेड शाइन व्हेरिएंट म्हणजे पॅनोरॅमिक सनरूफसह दिला जाणार आहे.तसेच यामध्ये सहा एअरबॅग्ज, १०.१ इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ६ स्पीकर ऑडिओ सिस्टम, ८० हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स, ऑटो डिमिंग आयआरव्हीएम आणि जिओची व्हॉइस रेकग्निशन सिस्टम यासारख्या सुविधा आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत, एसयूव्हीमध्ये १४ लेव्हल २ आणि १४ ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) फीचर्स आहेत…