सांगली : पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी तांदुळवाडी (ता.वाळवा) नजीक बस पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात चालकासह ३५ जण जखमी झाले. जखमींना कोल्हापूर, कराड आणि इस्लामपूरमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दहिवडी आगाराची दहिवडी ते जोतिबा ही एसटी बस जोतिबाकडे निघाली होती. वाटेत पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी नजीक गुरव पुलाजवळ पुलावरून कठडा तोडून बस ओढा पात्रात कोसळली. यामुळे गाडीतील ३५ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थातून मिळाली. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना कोल्हापूर येथील सीपीआर, कराडच्या कृष्णा हॉस्पिटल व इस्लामपुरातील प्रकाश मेमोरियल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. कुरळप पोलीस ठाण्याचे पोलीस अपघाताची माहिती घेत आहेत.

Story img Loader