शहर वाहतूक शाखा पोलिसांनी मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांचे कागदपत्र, परवाना तपासणी मोहीम राबवली. कागदपत्र, परवाने नाहीत अशा वाहनधारकांकडून या वेळी दंड वसूल करण्यात आला.
जवळपास ३५० वाहनांवर पोलिसांनी कारवाई करून ३३ हजार ८०० रुपये दंड वसूल केला आहे. लातूर शहर परिसरात गेल्या काही दिवसांपासून अप्रिय घटना घडत आहेत. या पाश्र्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात आली असावी, असा अंदाज व्यक्त होत होता. शहरातील शिवाजी चौक, बसवेश्वर चौक, राजीव गांधी चौक, अंबाजोगाई रोड, नवीन रेणापूर नाका, दयानंद गेट, गांधी चौक, नांदेड नाका येथे वाहतूक शाखेसह शहरातील चार पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी वाहन तपासणी केली.
लातुरात साडेतीनशे वाहनधारकांना दंड
शहर वाहतूक शाखा पोलिसांनी मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांचे कागदपत्र, परवाना तपासणी मोहीम राबवली. कागदपत्र, परवाने नाहीत अशा वाहनधारकांकडून या वेळी दंड वसूल करण्यात आला.
First published on: 17-06-2013 at 06:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 350 motor vehicles gets penalties and fines in latur