सांगली : कडेगांव येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून ३६ रूग्ण बाधित झाले असून काही रुग्ण ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी रूग्णालयास भेट देउन रूग्णांची विचारपूस केली. तसेच त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रम कदम यांच्याशी संवाद साधत रूग्णांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्याबरोबरच तातडीने उपचार करण्याची विनंती केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “…तर रोहित पवारांनी सांगावं”, अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांचं आव्हान

कडेगावमध्ये गेल्या दोन दिवसात गॅस्ट्रोची साथ पसरली असूनरूग्ण उलट्या व जुलाबाच्या तक्रारी करत रूग्णालयात उपचारासाठी येत आहेत. गेल्या दोन दिवसात कडेगावच्या ग्रामीण रूग्णालयात  ३६ रूग्ण उपचारासाठी दाखल झाले असून त्यांना रूग्णालयात दाखल करून सलाईन  लावण्यात आले. कोणत्याही रूग्णांची स्थिती चिंताजनक नसल्याचे सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री. देशमुख यांनी आज रूग्णालयात जाउन रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. तसेच शहराला  पाणीपुरवठा करणार्‍या ओढ्यावरील दोन्ही विहिरीजवळील स्थितीची पाहणीही केली. गेस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी चाललेल्या उपाययोजना माहिती घेऊन खबरदारी बाळगण्याच्या सूचना नगरसेवक व नगरपंचायत प्रशासनाला दिल्या. 

हेही वाचा >>> सातारा: पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जितेंद्र डूडी; जिल्हाधिकाऱ्यांकडून पालखी मार्गाची पाहणी

यावेळी कडेगावचे नगराध्यक्ष धनंजय देशमुख, उपनगराध्यक्ष नाजनीन पटेल, सभापती विजय गायकवाड, निलेश लंगडे, नगरसेवक पै. अमोल डांगे, विजयसिंह खाडे, युवराज राजपूत, दादासाहेब गायकवाड, प्रकाश शिंदे आण्णा, विलास धर्मे, राकेश जरग, सुधाकर चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामीण रूग्णालयाच्या डॉ. अर्चना कोडग यांनी सांगितले, सध्या रूग्ण वाढण्याचे प्रमाण आटोक्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. काही अत्यवस्थ रूग्णांना पुढील उपचारासाठी सांगली कराड रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बाह्यरूग्ण विभागात काही रूग्णांना औषधोपचार करण्यात आले तर सोमवारी ७ रूग्ण उपचारासाठी दाखल होते. फोटो- ग्रामीण रुग्णालय कडेगांव या ठिकाणी गॅस्ट्रोच्या रुग्णांची विचारपूस करताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, नगराध्यक्ष धनंजय देशमुख व अन्य.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 36 people affected with gastrointestinal disease spread in kadegaon zws