मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण तालुक्यातील आसुर्डे गावाजवळ एका खासगी ट्रॅव्‍हल्सची बस झाडाला धडकून उलटल्‍याने झालेल्‍या अपघातात ४ प्रवासी ठार आणि बारा जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (मंगळवार) पहाटे हा अपघात झाला. या अपघातानंतर बसचा चालक पळून गेला असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.
मुंबईहून गोव्याकडे जाणीरी ही बस आसुर्डे गावाजवळ बस चालकाचा ताबा सुटल्याने झाडाला धडकली आणि उलटली. त्यानंतर बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या दहा फूट खड्यामध्ये पलटी झाली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना डेरवन येथील वालावलकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.       
अपघातापूर्वी या बसने एका सुमोलाही धडक दिल्‍याचे काही प्रवाशांनी सांगितले. अपघातातील मृत प्रवाशांची ओळख पटलेली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा