गेल्या आठवड्यात जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यातील ४० शहीद जवान हे राजकीय बळी ठरले आहेत, असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूरातील एका कार्यक्रमात केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांनी पुलवामा प्रकरणावरून मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुलवामाचा हल्ला घडवून आणला आहे. त्यामुळे या हल्ल्यात शहीद झालेले जवान हे राजकीय बळी ठरले आहेत. आता पुढे निवडणूकीच्या मध्यात अशीच एक मोठी घटना घडवली जाईल आणि तुमचे सर्वांचे लक्ष तिकडे वळवले जाईल. आपली स्मरणशक्ती कमी असल्याने या घटनेनंतर तुम्ही सरकारचे घोटाळे विसरुन जाल.

सैन्य असो की सीबीआय सगळ्याच ठिकाणी गटबाजी भरलेली आहे, असे सांगताना भारत सरकार पाकिस्तानचे पाणी कसे काय अडवू शकते? असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी केला. पाकिस्तानला तुम्ही नळाद्वारे पाणी देता का? दोन देशांतून जाणारे पाणी कोणीही कसेही थांबवू शकतो का? यासाठी काही आंतरराष्ट्रीय नियम आहेत की नाही, असे अनेक सवाल यावेळी राज ठाकरे यांनी मोदी सरकारला विचारले.

पाकिस्तानचे पाणी रोखण्याच्या सरकारच्या भुमिकेवर भाष्य करताना पाकिस्तानला जाणारे पाणी अडवायचे तर नदीत अमित शाह आडवे झोपले आहेत, असे व्यंगचित्रही आपण काढणार असल्याचा खोचक टोलाही यावेळी त्यांनी लगावला. सरकारचे डावपेच काहीही असले तरी आपण निवडणुकीत मी राफेल विमान खरेदी घोटाळा, नोटाबंदीमधील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, सरकारच्या या सर्व निर्णयांमागे सल्लागार असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची आधी चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल, अशा शब्दांत राज ठाकरेंनी डोवालांनाही टार्गेट केले. निवडणुकांच्या तोंडावर पुलवामासारखे हल्ले घडवून आणायचे ही नीती अमेरिका अनेक वर्षांपासून अवलंबत असल्याचेही राज यावेळी म्हणाले.