खालापूर तालुक्यातील सावरोलीस्थित के. डी. एल. बायोटेक कंपनीचे सरव्यवस्थापक (सुरक्षा व प्रशासन) दीपक धुमाळ यांनी आपल्या केबिनमधील बॅगमध्ये ठेवलेली ४० हजार रुपयांची रोकड अज्ञात व्यक्तीने ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान लंपास केली आहे, अशी फिर्याद खालापूर पोलीस स्टेशनमध्ये १९ नोव्हेंबर रोजी दाखल केली आहे. सरव्यवस्थापक धुमाळ यांनी कंपनीसाठी खरेदी केलेल्या वस्तूच्या बिलाची रक्कम अदा करण्यासाठी कंपनीच्या कॅशिअरकडून ४० हजार रुपये रक्कम ताब्यात घेतली होती. आपल्या बॅगेमध्ये पैसे ठेवून ती बॅग आपल्या केबिनमध्ये ठेवली होती. दरम्यान, वरिष्ठांनी बोलाविल्याचा निरोप आल्यामुळे धुमाळ केबिनमध्ये बॅग ठेवून त्वरित वरिष्ठांकडे गेले. वरिष्ठांच्या केबिनमधून धुमाळ आपल्या केबिनमध्ये आले तेव्हा केबिनमध्ये बॅग जागेवर होती, पण बॅगेतील ४० हजार रुपये गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कंपनीमध्ये सर्व स्तरावर चौकशी केल्यानंतर लंपास करण्यात आलेल्या रकमेचा शोध लागू शकला नाही. अखेर त्यांनी १९ नोव्हेंबरला खालापूर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर फिर्याद दाखल केली. पो. नि. दूरगुंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेश म्हात्रे अधिक तपास करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा