कणकवली नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली असून, तिघांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशनपत्रे कायम ठेवली आहेत. या निवडणुकीत १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. शहर विकास आघाडी राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाने केली असून, मनसेने स्वतंत्र चार उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.
कणकवली नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसच्या तिघांनी बंडखोरीचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी, भाजपा व शिवसेनेची शहर विकास आघाडी काँग्रेससमोर उभी ठाकली आहे.
या निवडणुकीत १७ जागांसाठी ४१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात काँग्रेस १७, राष्ट्रवादी ६, भाजपा ५, शिवसेना ६, मनसे ४ व अपक्ष ३ अशी उमेदवारांची संख्या आहे. काँग्रेस विरोधातील लढाईत काँग्रेसच्या बंडखोरांचा सामना कसा रंगतो. त्यावर विरोधकांचे यश अवलंबून असल्याचे बोलले जाते.
कणकवली नगर पंचायत प्रभाग १ अमध्ये गौतम खुडकर व अमित लोखंडे (राष्ट्रवादी) , प्रभाग १ बमध्ये किशोर राणे (काँग्रेस), शेखर राणे (अपक्ष), शेखर साटम (राष्ट्रवादी). प्रभाग १ कमध्ये प्रज्ञा खोत (काँग्रेस), शैलजा धुमाळे (राष्ट्रवादी). प्रभाग १ डमध्ये सुविधा साटम (काँग्रेस) व दिव्या साळेगावकर (भाजपा) अशी लढत होणार आहे.
प्रभाग २ अमध्ये समीर नलावडे (काँग्रेस) व शिशीर परुळेकर (भाजपा), प्रभाग २ बमध्ये माधुरी गायकवाड (काँग्रेस) व वैभवी पाटकर (शिवसेना), प्रभाग २ कमध्ये प्रदीप मांजरेकर (शिवसेना) व अभी मुसळे (काँग्रेस), प्रभाग २ डमध्ये दीपा दळवी (राष्ट्रवादी) व माया सांबेकर (काँग्रेस), प्रभाग ३ अमध्ये अबीद नाईक (राष्ट्रवादी), कन्हैया पाटकर (काँग्रेस), संतोष सावंत (मनसे), प्रभाग ३ बमध्ये मेघा गांगण (काँग्रेस), नम्रता पारकर (भाजपा), तेजल लिंग्रास (मनसे), प्रभाग ३ कमध्ये भरत उबाळे (अपक्ष), शैलेश नेरकर (मनसे), मंगेश मसुरकर (भाजपा), गणेश हर्णे (काँग्रेस), प्रभाग ३ डमध्ये सुविधा अंधारी (काँग्रेस) व चित्रा सावंत (राष्ट्रवादी) अशी लढत होणार आहे.
प्रभाग ४ अमध्ये संतोष कुडाळकर (मनसे), रूपेश नार्वेकर (काँग्रेस) व समीर सावंत (शिवसेना), प्रभाग ४ बमध्ये सुशांत नाईक (शिवसेना), मधुसूदन परब (अपक्ष), राजन परब (काँग्रेस), प्रभाग ४ अमध्ये नंदिनी धुमाळे (शिवसेना) व गीता महाडिक (काँग्रेस), प्रभाग ४ डमध्ये राजश्री धुमाळे (भाजपाा) व तेजश्री डिचोलकर (काँग्रेस) व प्रभाग ४ डमध्ये स्नेहा नाईक (शिवसेना) व नीलम सावंत (काँग्रेस) अशी लढत होणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे पदाधिकारी होते, पण सध्या ते शिवसेनेत आहेत. त्यांची पत्नी स्नेहा व काँग्रेसच्या नीलम सावंत- पालव यांची लढत लक्षणीय आहे. श्रीधर नाईक यांचा मुलगा या निवडणुकीत उभा आहे. बाबू ऊर्फ सुशांत नाईक हा शिवसेनेतून लढत देत आहे, पण त्याला काँग्रेसचे बंडखोर मधुसूदन ऊर्फ भाई परब व राजन श्रीधर परब (काँग्रेस) यांच्याशी लढत द्यावी लागत आहे.
राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांना पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी व आता काँग्रेसचे संदेश पारकर यांचे बंधू कन्हैया पारकर (काँग्रेस) यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपाचे काही उमेदवार हे पूर्वाश्रमीचे एकत्रित पण सध्या वेगवेगळ्या पक्षांतून निवडणूक लढवत आहेत हेच लक्षणीय आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 41 candidate for 17 place in kankavli nagarpanchayat election
Show comments