अत्यावश्यक सेवेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सोलापूर महापालिकेतील तब्बल ४३ कर्मचाऱ्यांना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एकाचवेळी सेवेतून थेट बडतर्फ केले आहे. यात २५ चावीवाले व १८ विद्युत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, या कठोर कारवाईच्या पाठोपाठ आयुक्त गुडेवार यांनी लगेचच अनुकंपा तत्त्वाखालील प्रतीक्षा यादीतील ३७ जणांना सेवेत दाखल करून घेतले आहे.
गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या काळात शहरात काही ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. याप्रकरणी चौकशी केली असता पाणीपुरवठा विभागातील चावीवाले म्हणून सेवेत असलेले कर्मचारी वरिष्ठांना न कळविता परस्पर गैरहजर असल्याचे आढळून आले. याप्रकरणी संबंधितांना नोटिसा बजावल्या तरी त्यावर समाधानकारक उत्तरे दिली गेली नाहीत. त्यामुळे आयुक्त गुडेवार यांनी संबंधित चावीवाल्यांसह विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांना सेवेतून थेट बडतर्फीची कारवाई केली.
दरम्यान, या कारवाईनंतर गुडेवार यांनी प्रशासन सुरळीत चालण्यासाठी लगेचच अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा यादीवर असलेल्या ३७ उमेदवारांना सेवेत दाखल करून घेतले. यात ८ कनिष्ठ लिपीक, ८ शिपाई, २१ मजूर यांचा समावेश आहे. या सर्वाचा एक वर्षांचा प्रशिक्षणाचा कालावधी राहणार आहे.
सेवेत हलगर्जीपणा करणारे ४३ कर्मचारी थेट बडतर्फ
अत्यावश्यक सेवेत हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सोलापूर महापालिकेतील तब्बल ४३ कर्मचाऱ्यांना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी एकाचवेळी सेवेतून थेट बडतर्फ केले आहे. यात २५ चावीवाले व १८ विद्युत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
First published on: 04-09-2014 at 02:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 43 employee suspended in solapur corporation