अलिबाग : रायगड जिल्ह्यात कुष्ठरोग निमुर्लन मोहीमे अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ४७९ कुष्ठरोगी आढळून आले आहेत. आदिवासी बहुल तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण अधिक आहे. महत्वाची बाब म्हणजे १५ पैकी १३ तालुक्यात कुष्ठरोगाचे प्रमाण नियंत्रित मानकापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेणच्‍या वरवणे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीला कुष्‍ठरूग्‍ण घोषित करण्‍यात आले होते. तिला कुष्‍ठरोग झालाच नव्‍हता असा दावा करीत चुकीच्‍या औषधोपचारामुळे मुलीचा मृत्‍यू झाल्‍याचा आरोप तिच्‍या पालकांनी केला. त्‍यानंतर जिल्‍हयातील कुष्‍ठरूग्‍णांचा मुद्दा चर्चेत आला. जिल्‍हयातील कुष्‍ठरूग्‍णांच्‍या संख्‍येवर नजर टाकली तर परीस्थिती चांगली नसल्‍याचे समोर येत आहे. तर आदिवासींची लोकसंख्‍या जास्‍त असलेल्‍या तालुक्‍यात गंभीर स्थिती असल्‍याचे आकडेवारी सांगते.

आरोग्‍य विभागाच्‍या निर्देशानुसार दर दहाहजार लोकसंख्येमागे कुष्‍ठरूग्‍णांचे प्रमाण १ पेक्षा कमी असेल तर स्थिती नियंत्रणात असल्‍याचे मानले जाते. परंतु रायगड मधील १५ पैकी १३ तालुक्‍यांमध्‍ये १० हजार लोकसंख्‍येमागे हे प्रमाण एक किंवा त्‍यापेक्षा अधिक असल्‍याचे आकडेवारीवरून दिसून येते. जिल्‍हयात क्रियाशील कुष्‍ठरूग्‍णांची संख्‍या ४७९ इतकी आहे. कर्जत तालुक्‍यात सर्वाधिक ७६ रूग्‍ण आहेत. तर सुधागड तालुक्‍यातील दर दहाहजारी ४.४ ही रूग्‍णसंख्‍या चिंताजनक आहे.

शासनाने कुष्‍ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत नवीन रूग्‍णशोध मोहीम हाती घेतली आहे. यातून मोठया प्रमाणावर रूग्‍ण सापडत आहेत. नवीन रूग्‍णांमध्‍ये मुलांची संख्‍या ६२ आहे तर २११ महिला कुष्‍ठरूग्‍ण सापडल्‍या आहेत. यातील मुलांची संख्‍यादेखील चिंताजनक आहे. महिलांमध्‍ये आजार लपवून ठेवण्‍याची प्रवृत्‍ती अधिक असते. शासनाने कुष्‍ठरूग्‍ण शोध मोहीम राबवल्‍यामुळे रूग्‍णांची संख्‍या समोर आली आहे अन्‍यथा हे रूग्‍ण समोर आलेच नसते. त्‍यामुळे वाढत्‍या रूग्‍णसंख्‍येमुळे घाबरण्‍याचे कारण नाही, असं आरोग्‍य विभागाचे म्‍हणणे आहे.

रायगड जिल्‍हयात सध्‍या कुष्ठरुग्ण शोध अभियान सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील ५ लाख १६ हजार घरांना आशा व आरोग्य कर्मचारी भेट देणार असून २३ लाख लोकसंखेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी २ हजार १०० पथके तयार करण्यात आली आहेत. ४०३ पर्यवेक्षकांच्या माध्यमातून मोहिम राबविण्यात येणार आहे. मोहिमेअंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येणार आहेत. नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कुष्ठरुग्ण शोध मोहिमेतंर्गत आशा स्वयंसेविका, स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्णांचा शोध घेणार आहेत. नागरिकांनी कृष्ठरोग आजारबाबत गैरसमज व भीती न बाळगता घरी येणाऱ्या पथकाला सहकार्य करावे. सदर मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले असून, एकही बाधित व्यक्ती उपचारविना राहणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. -भरत बास्‍टेवाड, मुख्‍य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्‍हा परीषद

राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती कशी…

केंद्र व राज्य शासन कुष्ठरोग नियंत्रणासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधींचा खर्च करते. परंतु, आजही सगळ्याच जिल्ह्यात कमी अधिक कुष्ठरुग्ण आढळत आहेत. राज्याच्या इतर भागाच्या तुलनेत पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या सहा जिल्ह्यांत या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळतात. सध्या या भागात ४ हजार १४५ सक्रिय रुग्ण उपचाराखाली आहेत.

कुष्‍ठरूग्‍णांची तालुकावार आकडेवारी

तालुका क्रियाशील रूग्‍ण संख्‍या दहा हजार लोकसंख्‍येमागे प्रमाण
अलिबाग २३ ०.९
कर्जत ७६ ३.२
खालापूर ४५ १.९
महाड ३१ १.७
माणगाव ३३ १.४
म्‍हसळा १० १.३
मुरूड १.०
पनवेल ४८ १.५
पेण ४४ २.१
पोलादपूर २.३
रोहा ३८ २.२
श्रीवर्धन १.०
सुधागड ३२ ४.४
तळा १.८
उरण १६ ०.९
पनवेल मनपा५५ ०.६
एकूण ४७९१.५