जिल्ह्य़ातील विविध पदाधिकाऱ्यांना आपला तालुका बदलून इतर तालुक्यातील पक्षाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी संपूर्ण जिल्ह्य़ात ४८ निरीक्षक नियुक्त केले आहेत. या नियुक्त्यांमुळे प्रत्येक तालुक्यात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती शहर स्तरावर सातत्याने मिळत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी कालावधीत जिल्ह्य़ात राष्ट्रवादीचा पाया बळकट करण्यासाठी पक्षाने विविध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नेत्यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही प्रस्तावित आहे असे पगार यांनी सांगितले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताहातील विविध उपक्रमांचा, आरोग्य शिबिरांचा लाभ गावागावांत पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक मतदारसंघात दोन निरीक्षक देण्यात आले आहेत.
नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ४८ निरीक्षक
जिल्ह्य़ातील विविध पदाधिकाऱ्यांना आपला तालुका बदलून इतर तालुक्यातील पक्षाच्या कामकाजावर देखरेख करण्यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी संपूर्ण जिल्ह्य़ात ४८ निरीक्षक नियुक्त केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 10-12-2012 at 01:50 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 48 ncp observer in nashik