पत्नीच्या बाहेरख्याली वागण्याला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याची संदेश भ्रमणध्वनीवरील व्हॉटसअॅपवर देउन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना जतमधील शिवाजीनगर मध्ये घडली. या प्रकरणी दोन महिलांसह चौघांविरूध्द जत पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> वेगळ्या विदर्भासाठी परिस्थिती अनुकूल, ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भ लोकसेवा आयोग…
याबाबत माहिती अशी, मंगळवारी दुपारी दत्तात्रय लिंगाप्पा माळी (वय ४८) याने पत्र्याच्या शेडमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. तत्पुर्वी आपण पत्नी सुस्मिता कोळी हिच्या बाहेरख्याली पणाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहीली.तसेच भ्रमणध्वनीवर हा संदेश ध्वनीमुद्रित केला.
हेही वाचा >>> “महाराष्ट्रातलं मंत्रालय हे आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध, सरकार मात्र जाळ्या…”, काँग्रेसची बोचरी टीका
याबाबत मृताची बहिण रूक्मिणी कोळी यांनी जत पोलीस ठाण्यात चौघाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. सुस्मिता कोळी, शोभा माळी, बाबूराव कागवाडे व सुनिल कागवाडे या चौघाविरूध्द जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठ दिवसापुर्वी पती आणि पत्नीमध्ये याच कारणावरून वाद झाला होता. मंगळवारी सकाळी मृत दत्तात्रय याबाबत बाबूराव कागवाडे याला विचारणा करण्यास गेला होता. त्यावेळी दोघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली. याचा मनस्ताप होउन त्यांने आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलल्याचे तक्रारीत म्हटले आहे.