गंगाखेड शुगर्सचे बनावट पीक कर्जवाटप प्रकरण
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
औरंगाबाद : विधिमंडळ अधिवेशनात ज्यांच्या नावाचा उल्लेख महाराष्ट्राचा नीरव मोदी असा करण्यात आला, त्या रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर अॅण्ड एॅनजी प्रा. लि. या कारखान्यातील घोटाळा आता ३२८ कोटी रुपयांवरून ४९९ कोटी ८९ लाख रुपयांपर्यंत वाढला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. १७१ कोटी रुपयांनी या घोटाळातील आकडा वाढल्याच्या वृत्ताला राज्य गुन्हा अन्वेषण विभागातील सूत्रांनी दुजोरा दिला. या अनुषंगाने गंगाखेड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्य़ात राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे तपास आल्यानंतर त्यांनी १३ हजार ८१७ संचिका ताब्यात घेतल्या असून ३२३ साक्षीदार तपासले आहेत. केवळ एवढेच नाही तर विविध बँकांना तब्बल ५५०७ कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फसविल्याचे असल्याचेही पुढे येत आहे. या फसवणुकीच्या अनुषंगाने गिरीधर शिवाजी साळुंखे या शेतकऱ्याने अंमलबजावणी संचालनालयाकडे तक्रारही केली आहे. वेगवेगळ्या २२ कंपन्यांमार्फत गुट्टे आणि त्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांनी घातलेले घोळ पुढे येत असल्याने बँकेतील अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
परभणी जिल्ह्य़ातील मारुती राठोड या शेतकऱ्याला त्याच्या वडिलांच्या आजारपणासाठी कर्ज घ्यायचे होते. त्याच्याकडून सर्व कागदपत्रे घेण्यात आली. मात्र, पीक कर्ज देण्यापूर्वी अन्य बँकांतून त्याने कर्ज उचलले आहे का, याचा अहवाल तपासताना बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, नागपूरच्या धर्मपेठ शाखेतून आंध्र बँकेकडून त्याच्या नावावर कर्ज आहे. नागपूरमध्ये कधीही गेलो नसताना आपल्या नावावर कोणी कर्ज घेतले, याचा शोध घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि ३२८ कोटी रुपयांचा गुन्हा उघडकीस आला. आठ ते दहा हजार शेतकऱ्यांचे सातबारे, फोटो अशी बनावट कागदपत्रे तयार करून बँकांना सादर केली गेली. शेतकऱ्यांचा अर्ज नसतानाही हे कर्ज देताना आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक, बँक ऑफ इंडिया, रत्नाकर बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा केला गेला होता. कर्जखाते उघडण्यासाठी बँकेने शेतकऱ्यांच्या सह्य़ा न घेता पीक कर्ज शेतकऱ्यांच्या नावावर टाकले आणि ते कर्ज परस्पर गंगाखेड शुगर्सच्या खात्यात वळवून घेतले. दहा दिवसांच्या कार्यकाळात सर्व बँकांनी आठ ते दहा हजार शेतकऱ्यांच्या नावे पीक कर्ज मंजूर केले. ज्यांना कर्ज मंजूर केले, त्यातील अनेक शेतकरी ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. काही जणांचा मृत्यूही झाला आहे. कर्ज देताना कोणतीही पडताळणी न करता झालेल्या या व्यवहाराचा तपास सुरू आहे. मात्र अद्याप एकाही व्यक्तीला अटक झालेली नाही.
आंध्र बँकेने ३९.१७ कोटी, युको बँकेने ४७.७८ कोटी, युनायटेड बँकेने ७६.३२ कोटी, बँक ऑफ इंडियाने ७७.५९ कोटी, सिंडिकेट बँकेने ४७.२७ कोटी, रत्नाकर बँकेने ४०.२० कोटी रुपये बोगस कागदपत्रांच्या आधारे पीककर्ज वाटप केले. ज्याचा लाभ गंगाखेड शुगर्सने घेतला. याचा तपास सुरू असतानाच अन्यही कागदपत्रे मिळविण्यात आली. गंगाखेडचे आमदार मधुसूदन केंद्रे यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून गुट्टे आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकांची आणि शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली, याची कागदपत्रे जमविण्यात आली. या आधारे गिरीधर शिवाजी साळुंखे या परळी तालुक्यातील शेतकऱ्याने आता अंमलबजावणी संचालनालयाकडे गुट्टे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी बँकांना कसे फसवले, याची तक्रार केली आहे. दरम्यान, हे प्रकरण विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी लावून धरले. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांचा नीरव मोदी असा उल्लेख करत वेगवेगळ्या बँकांना ५५०७ कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याचा दावा केला आहे. त्या पुष्टय़र्थ मिळवलेल्या कागदपत्रांच्या आधारे बरीच प्रकरणे पुढे येण्याची शक्यता आहे.
गंगाखेड शुगर्स या साखर कारखान्याचे भागभांडवल ८० कोटी १७ लाख एवढे असताना कारखान्याला विविध बँकांनी आतापर्यंत १४६६ कोटी ४४ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. या कंपनीच्या जमानतीवर गंगाखेड शुगर्सने योगेश्वरी हॅचरीज या कंपनीसाठी ६५५ कोटी ७८ लाख रुपयांचे कर्ज घेतले. योगेश्वरी हॅचरीज ही कंपनी गुट्टे यांच्या पत्नीच्या नावे आहे. या कर्जासाठी केलेले गहाणखत अत्यंत कमी असल्याचा आरोप केला जात आहे. विविध बँकांमध्ये केलेली ही फसवणूक मोठय़ा प्रमाणात असल्याची कागदपत्रेही जमवण्यात आली आहेत. पहिल्या गुन्ह्य़ातील पीक कर्जाच्या घोटाळ्याचा आकडा आता ४९९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.