नगर :  कर्जत शहरात एका तरुणावर झालेल्या  हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यातील दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. या दोघांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. तर उर्वरित तीन जणांना  शनिवारी अटक करण्यात आली. त्यांना आज, रविवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. दरम्यान, आज कर्जतमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिकांच्या बैठकीत शांततेचे आवाहन करण्यात आले. भाजपच्या निलंबित नेत्या नूपुर शर्माना समाजमाध्यमावर पाठिंबा दिल्याने आक्षेप घेत तरुणांच्या एका गटाने हल्ला केल्याची तक्रार जखमी तरुणाने दिली आहे. याप्रकरणी सोहेल पठाण (२४), अरबाज पठाण (२३, दोघे रा. कर्जत) या दोघांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर जुनेद पठाण (१९, कर्जत), अरबाज शेख (२४, रा. दौंड) व हुसेन शेख (४०, बारामती, पुणे) या तिघांना आज अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली.