टायर फुटून गाडी दरीत कोसळल्याने गुजरात पांडेसरा येथील एकाच कुटुंबातील पाच जण जागीच ठार झाले, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता झाराप-पत्रादेवी महामार्गावर मळगाव ब्राह्मणआळी येथे घडला. जयशभाई सीताराम नारकर (४१), धनगौरीबेन जयशभाई नारकर (४०), रोहन जयशभाई नारकर (२१), सपना मुकुंद पोल (३०), मंथन मुकुंद पोल (७) अशी मृतांची नावे असून, जेनिश जयशभाई नारकर (१६) व मुकुंद पोल (३५) हे दोघे या अपघातातून वाचले. जयशभाई नारकर हे मूळचे रत्नागिरीचे असून गेली काही वर्षे ते मुलगा जेनिश यांच्याकडे गुजरातमध्येच राहत होते. नारकर कुटुंबीय गुजरातहून गोवा फिरण्याकरिता फोक्स व्हॅगन व्हिन्टा कारने आले होते. शनिवारी सकाळी ते गोव्याहून गुजरात येथे परतत होते.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-12-2013 at 02:43 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 killed in road accident near sawantwadi