Petrol and Diesel Price In Maharashtra : आज ५ मार्च २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. तसेच मार्च महिन्याच्या पाचव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला आहे. कित्येक दिवसांपासून मुंबई शहरांतील पेट्रोल व डिझेलचा दर स्थिर आहे. मात्र इतर शहरांतील इंधनाच्या दरात आज किंचित वाढ झाली आहे. तर तुमच्या शहरात तुम्हाला एक लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार हे आपण जाणून घेऊला…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेट्रोल-डिझेलचा दर (Petrol and Diesel Price )

शहरपेट्रोल (प्रति लिटर )
डिझेल (प्रति लिटर )

अहमदनगर१०४.९४९१.४५
अकोला१०४.६१९१.१६
अमरावती१०५.४५९१.९६
औरंगाबाद१०५.१८९१.६८
भंडारा१०४.०८९१.६१
बीड१०५.१०९१.६०
बुलढाणा१०४.४२९०.९७
चंद्रपूर१०४.१०९०.६८
धुळे१०४.५१९१.०४
गडचिरोली१०४.९०९१.४४
गोंदिया१०५.५०९२.०३
हिंगोली१०५.५०९२.०१
जळगाव१०४.११९०.९४
जालना१०५.५०९२.०३
कोल्हापूर१०४.५६९१.९०
लातूर१०५.३८९१.८८
मुंबई शहर१०३.५०९०.०३
नागपूर१०४.६२९१.१६
नांदेड१०५.५०९२.०३
नंदुरबार१०४.९७९१.४८
नाशिक१०४.६६९१.१७
उस्मानाबाद१०५.१८९१.८९
पालघर१०३.७५९०.२६
परभणी१०५.५०९२.०३
पुणे१०४.८४९१.३४
रायगड१०४.१२९०.६२
रत्नागिरी१०५.५०९२.०३
सांगली१०४.३४९०.८९
सातारा१०४.४१९०.९३
सिंधुदुर्ग१०५.५०९२.०३
सोलापूर१०४.३०९०.८५
ठाणे१०३.६४९०.१६
वर्धा१०४.९१९१.४४
वाशिम१०५.०५९१.५८
यवतमाळ१०५.३२९१.८४

वेगवेगळ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस चढउतार होत असतात. व्हॅट, मालवाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती राज्यानुसार बदलतात. तर हे दर दररोज सकाळी ६ वाजता जाहीर केले जातात आणि ते नंतर सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. तर आजचे दर पाहता पेट्रोल व डिझेलच्या दरात किंचित वाढ झाली आहे.

घरबसल्या चेक करा नवे दर :

तुम्ही घरबसल्या पेट्रोल-डिझेलचे नवे दर चेक करू शकता. त्यासाठी तुम्हाला इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवा आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 टाइप करून माहिती मिळवू शकतात. त्याचबरोबर HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

मारुतीच्या ‘या’ कारमध्ये मिळणार सहा एअरबॅग्ज!

मारुती सुझुकीच्या अपडेटेड अल्टो के१० ला दोन नवीन फीचर्स देण्यात आली आहेत. अल्टो के१० च्या सर्व व्हेरिएंटमध्ये आता सहा एअरबॅग्ज देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कारच्या किमतीत १६ हजार रुपयांनी वाढ झाली आहे. त्यानुसार आता मारुती अल्टो के१० ची किंमत ४.२३ लाख रुपयांपासून ते ६.२१ लाख रुपयांपर्यंत (दोन्ही एक्स-शोरूम) असेल. अपग्रेड केलेल्या सुरक्षा उपकरणांव्यतिरिक्त मारुतीने अल्टो के१० चा म्युझिक सिस्टीमसुद्धा अपग्रेड केला आहे; ज्यामध्ये तुम्हाला आता दोनऐवजी चार स्पीकर्स दिले जातील. फीचर्स हायलाइट्समध्ये सात इंची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, कीलेस एंट्री, स्टेअरिंग-माउंटेड कंट्रोल्स, मॅन्युअली ॲडजस्टेबल बाहेरील रीअर व्ह्यु मिरर (ORVM) व सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.