कुंपणाच्या तारेतून प्रवाहीत होत असलेल्या विजेच्या धक्क्य़ाने एका पाच वर्षीय बालिकेचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी तालुक्यातील ब्राह्मणवाडी गावात घडली. मुळची विक्रमगड तालुक्यातील मोह गावात राहणारी प्रणाली बात्रा तिची आजारी आई ज्योत्स्नासह ब्राह्मणवाडीतील  डॉ. रितेश परदेशी यांच्या खाजगी दवाखान्यात आली होती. ज्योत्स्नावर उपचार सुरू असताना दवाखान्याच्या परिसरात फिरणाऱ्या प्रणालीचा  कुंपणाच्या तारेस हात लागला. तारेतून विद्युत प्रवाह वाहत असल्याने त्याच्या धक्क्य़ाने तिचा जागीच मृत्यू झाला. शेजारी राहणाऱ्या नारायण सोगळे यांच्या घरातून घेतलेल्या विजेचा प्रवाह कुंपणातून प्रवाहीत होत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Story img Loader