सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सन २०१३-१४  मध्ये ४९ कोटी ४७ लाख इतक्या रुपयाचा नफा झाल्याचे बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी संचालक मंडळाच्या बठकीत सांगितले.
बँकेचा निवळ्ळ नफा रुपये २३ कोटीमधून ५ कोटी ७५ लाख राखीव, ३ कोटी ४५ लाख शेती पतस्थर्य निधी, १३ कोटी ३८ लाख सहकारी संस्था लाभांश, १० लाखांचा इमारत निधी, ५ लाखांचा धर्मादाय, तर २७ लाख कल्याण सेवकल्याण निधीची तरतूद केली आहे. त्याचबरोबर उर्वरित २६ कोटी ४७ लाखांच्या ढोबळ नफ्यातून सभासदांचे हित संरक्षण व प्रोत्साहनपर मदत या बाबतीत विचार करून धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये १ लाखापर्यंत शेतकरी सभासदांसाठी अल्पमुदत कर्ज हे शून्य टक्के व्याजदराने तर मध्यम व दीर्घ मुदतीसाठी दिल्या गेलेल्या शेती पुरक कर्जाकरिता वसूल पात्र हप्ते व कावधीकरिता १० टक्के व्याज सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.
यावर्षी बँकेने वखार महामंडळाचा परवाना प्राप्त करून गोदाम पावतीवर कर्ज पुरवठा करण्यात यावा यासाठी ५० गोडावूनचा समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी महामंडळाच्या पावतीवर ४ टक्के दराने कर्ज पुरवठा सुरू केला आहे. बँकेचे संगणकीकरण, कोअर बँकिंग प्रणाली इ. सेवा योजनेचा अंतरभाव असेल. गारपीट, अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन उत्पन्नात घट झाल्याने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी व्याज दरात सवलत. महिला बचत गटांना अत्यंत अल्प दराने म्हणजे ४ टक्के दराने कर्ज पुरवठा करणे, जिल्ह्यातील शेतकरी सभासदांच्या मुलांना देशात व परदेशात शिक्षणासाठी ११ टक्केने कर्जपुरवठा, संचालक मंडळाच्या बठकीमध्ये बँकेच्या अध्यक्षांनी विविध योजनांचाही आढावा घेतला.
एसएचजी सक्षमीकरण व एसएचजीसाठी बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनेही काही गोष्टी करण्यात आल्या आहेत. २०१४-१५ विविध  योजनांची आखणी करून  बँक सर्वसामान्य ठेविदारांची, शेतकऱ्यांची राहील या बाबतीमध्ये प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत, असे बँकेचे अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी सांगितले. यावेळी रामराजे नाईक िनबाळकर, प्रभाकर घाग्रे, अनिल देसाई, दादाराजे खर्डेकर, प्रकाश बडेकर उपस्थित होते.

Story img Loader