सांंगली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे बहुमत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत गेल्या सहा वर्षांत झालेल्या ५० कोटी ५८ लाख रुपये गैरव्यहाराप्रकरणी वसुली निश्‍चित करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी सोमवारी दिले. यासाठी कोल्हापूरच्या सहकारी संस्था उपनिबंधक डॉ. प्रिया दळणर यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेतील मे २०१५ ते डिसेंबर २०२१ या कालावधीत आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत होते. या कालावधीत थकबाकी असलेल्या सहकारी संस्था ताब्यात घेऊन वसुली करणे, मालमत्ता खरेदी करणे, विकास सोसायट्या संगणकीकृत करणे आदीबाबत गैरव्यवहार झाल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी केली होती. या तक्रारीची चौकशी विशेष समितीमार्फत करण्यात आली. या समितीने दिलेल्या अहवालात आक्षेप घेण्यात आलेल्या बाबीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला.
या अहवालाच्या आधारे विभागीय सह निबंधक अरूण काकडे यांनी सहकार संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ (२) अन्वये गैरव्यवहारातील रक्कमेची वसुली निश्‍चित करण्याचे आदेश सोमवारी दिले.

Due to assembly elections instructions have issued regarding school continuity on November 18 19
शाळा सुरू ठेवण्याबाबत शिक्षण आयुक्तांच्या सुधारित सूचना… होणार काय?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
RBI announces changes to KYC rules! How it will impact you
KYC : RBI ने केली KYC नियम बदलण्याची घोषणा, आपल्यावर नेमका कसा परिणाम होणार?

हेही वाचा – सांगलीची जागा कॉंग्रेसलाच मिळेल – विशाल पाटील

हेही वाचा – मोहोळमध्ये बलाढ्य राष्ट्रवादीशी झुंज देणारे संजय क्षीरसागर भाजपकडून बेदखल, यशवंत सेनेकडून उमेदवारी

या कालावधीत महांकाली साखर कारखान्याची थकित कर्ज वसुलीसाठी मिळकती बँकेने खरेदी केल्या, मात्र, याची नोंद मुद्रांक नोंदणीसाठी विलंब केल्याने १ कोटी ९७ लाख रुपयांचा दंड बँकेस झाला. विकास सेवा संस्था संगणकीकृत करण्यासाठी नाबार्डने प्रस्ताव अमान्य केला असताना घाईगडबडीने महत्वकांक्षी प्रकल्प या नावाने बँकेने १४ कोटी ६७ लाखाचा अनाठाई खर्च केला. तर महांकाली कारखान्याची मालमत्ता खरेदी वेळी कायदेशीर वसुली खर्च, व्याज यांचा जमाखर्च केला नाही यामुळे बँकेला २२ कोटी ४२ लाख रुपये व्याजाला मुकावे लागले. महांकालीची साखर जप्त करत असताना त्याचा पंचनामा केला नाही. यामुळे २४ हजार ११६ क्विंंटल खराब साखर असल्याने यामुळे ११ कोटी ५१ लाख रुपयांचा तोटा झाला. असा एकूण चार बाबीमध्ये ५० कोटी ५८ लाख ८७ हजार ८८० रुपये वसुलीप्राप्त रक्कम असून याची वसुली तत्कालिन संचालक, कार्यकारी संचालक यांच्यावर निश्‍चित करावी असे निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत.