सरकारच्या हातात दहा दिवस आहेत. आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे हीच आमची मागणी आहे आम्ही ते घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आज आंतरवलीत जे लोक आले आहेत तो मराठा समाजासाठी सुवर्णक्षण आहे. प्रत्येक मराठा बांधव या कार्यक्रमाला आला आहे याचा मला आनंद आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. येत्या दहा दिवसात आम्ही आरक्षण घेणारच असा एक इशाराच एक प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसंच पाच हजार पुरावे पुरेसे नाहीत मग काय ट्रकभर पुरावे हवेत का? असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
आमची भावना जर सरकारला समजत नसेल तर त्यांनी काय समजावं. आंदोलन शांततेत होणार, त्यात बदल होणार नाही. पण सरकारला आंदोलन द्यावंच लागेल असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच येत्या दहा दिवसात सरकारने आरक्षण दिलं नाही तरीही शांततेचा भंग होणार नाही. आरक्षण दिलं नाही तर पुढची भूमिका त्यानंतर ठरवू असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. मी आज समाजासमोर सगळी वस्तुस्थिती मांडणार आहे.
हे पण वाचा “गुणरत्न सदावर्तेंना त्यांच्या मालकांनी समज द्यावी”, मनोज जरांगे पाटील यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
मराठा समाज आज शांत आहे. मायबाप मराठा समाजावर माझा विश्वास आहे. शांततेत आंदोलन केल्यामुळेच आम्ही इथपर्यंत आलो आहोत. आम्ही काहीही झालं तरीही आरक्षण घेणार हे मी आज ठामपणे सांगतो आहे. पहिले पाढे पंचावन्नसारखं न टिकणारं आरक्षण आम्हाला नको. सध्या शिंदे समिती मराठवाड्यात फिरते आहे.सरकारचं म्हणणं आहे की ५ हजार पुरावे पुरेसे नाहीत माझं त्यांना विचारणं आहे तुम्हाला काय ट्रकभर पुरावे हवेत का? एक पुरावा सापडला तरीही पुरावा. आयोग किंवा समिती स्थापन केली तर ते तरी पाच हजार पानांचा अहवाल देतात का? असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. काही वेळापूर्वीच मनोज जरांगेंनी टीव्ही ९ शी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.