राज्य पोलीस दलात ५१६ पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. बढतीत मराठवाडय़ातील ३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीची प्रतीक्षा होती. दिवाळीपूर्वी या पदोन्नत्या होतील, असे वाटत असताना बुधवारी राज्याच्या गृह विभागाने पदोन्नतीचे आदेश जारी केले. पोलीस महासंचालक संजीव दयाल यांच्या सहीने निघालेल्या या आदेशात ५१६ फौजदारांना सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांची नावे व त्यांची नवीन पदस्थापना – सुनील कुलकर्णी (औरंगाबाद), राजश्री आडे (जालना), सय्यद रफीक, उदय खंडेराय (नांदेड परिक्षेत्र), प्रवीण यादव (रा.गु.वि.), रोहिणी पोतदार (बाभुळगाव, लातूर), शुभांगी देशमुख, अनिल परझने, संभाजी पवार, कृष्णचंद्र शिंदे, प्रकाश गायकवाड, गजानन कल्याणकर, अजिनाथ काशीद, भरत राऊत, उज्ज्वला दिवाण, सुरेश साबळे, नामदेव जादळ, अर्जुन डोईफोडे, भगवान बेले, महादेव जाधव, निमिष मेहत्रे, संजय सहाणे, विवेक पाटील, बाबुशा पोहार (औरंगाबाद परिक्षेत्र), नितीनकुमार चिंचोलकर, प्रल्हाद सूर्यवंशी, स. अखिल, धोंडीराम गायकवाड, अविनाश पवार, रावसाहेब गाडेवाड, वर्षां दंडीणे, यशवंत कदम, प्रकाश राठोड, बळवंत पेडगावकर, विलास खिल्लारे, वामन बंदेवाड, संजीव मिरकले. विठ्ठल खुने (नांदेड).
पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करून पदोन्नतीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पदोन्नती झालेल्या सर्व अधिकाऱ्यांचे पोलीस महासंचालकांनी याच आदेशाद्वारे अभिनंदनही केले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
राज्यातील ५१६ फौजदारांना बढती
राज्य पोलीस दलात ५१६ पोलीस उपनिरीक्षकांना सहायक पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. बढतीत मराठवाडय़ातील ३९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीची प्रतीक्षा होती. दिवाळीपूर्वी या पदोन्नत्या होतील, असे वाटत असताना बुधवारी राज्याच्या गृह विभागाने पदोन्नतीचे आदेश जारी केले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-11-2012 at 04:51 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 516 officer of the state government promoted out of 39 from marathwada