लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सांगली : मान्सूनपूर्व नालेसफाईच्या मोहिमेत सांगलीतील शंभर फुटी भोबे गटारीतून दोन दिवसात तब्बल ५२ टन प्लास्टिक मिश्रित कचरा काढण्यात आला. या गटारीची स्वच्छता मोहिम अंतिम टप्प्यात आली असल्याचे महापालिकेच्यावतीने गुरूवारी सांगण्यात आले.

महापालिकेने पावसाळी पूर्व नाले सफाई ,स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुकत वैभव साबळे, आरोग्याधिकारी डॉ. रविंद्र ताटे यांच्या पथकाकडून ही मोहिम राबविण्यात येत असून शहरातील शंभर फुटी रोडवरील भोबे मोठी गटार स्वच्छतेची मोहीम कालपासून हाती घेण्यात आली. अवघ्या दोन दिवसात या गटारीतून प्लास्टिक व अन्य असा ५२ टन कचरा काढण्यात आला. ही गटार शहरातील सांडपाणी वाहून नेणारी मुख्य वाहिनी आहे.

आणखी वाचा-अदानी आणि अंबानी दोस्तीवरून लक्ष वळविण्यासाठी मोदी वेगळी चर्चा करतात- शरद पवार

भोबे गटार स्वच्छतेसाठी महापालिका प्रशासनाने तीन जेसीबी व पाच डंपर वापरण्यात येत असून याद्वारे या गटारीतील कचरा दूर करण्याचे काम सुरू आहे. या कामी वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर देखरेख करत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 52 tons of garbage was removed from the sewer in two days mrj