महाविकास आघाडीचे सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ५१ आमदारांनी शरद पवारांना पत्र लिहित भाजपाबरोबर जाण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. पण, शरद पवार वेळेवर निर्णय घेण्यास अयशस्वी ठरले, असा गौप्यस्फोट खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मुलाखत दिली आहे.

प्रफुल्ल पटेल म्हणाले, “२०२२ च्या मध्यातच भाजपाबरोबर जाण्यासाठी हाचलाची सुरु झाल्या होत्या. मात्र, शरद पवार तातडीने निर्णय घेण्यास अपयशी ठरले. यामुळे एकनाथ शिंदे यांनी संधी साधली आणि देवेंद्र फडणवीसांबरोबर जात सरकार स्थापन केलं.”

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
PM Narendra Modi interaction with Chief Secretaries across country for two days
पंतप्रधान मोदी देशभरातील मुख्य सचिवांशी साधणार दोन दिवस संवाद
Maharashtra Legislative Council Chairman post,
विधान परिषदेचे सभापतीपद कोणाकडे ?
Dhavalsingh Mohite Patil resigned as district president due to Sushilkumar and Praniti Shindes arbitrariness
सोलापुरात काँग्रेस पक्ष नसून शिंदे काँग्रेस; धवलसिंह मोहिते यांचा आरोप करीत जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

हेही वाचा : अजित पवारांसह ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरु झाली का? राहुल नार्वेकर म्हणाले, “आतापर्यंत…”

“आमदार, नेते नाहीच तर तळागळातील कार्यकर्तेही सरकारचा एक भाग बनले पाहिजेत. अनेक आमदारांना मतदारसंघातील निधीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पण, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आल्याने हे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील,” अशी अपेक्षा प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : प्रदेशाध्यक्ष आणि प्रतोदाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला? उज्ज्वल निकम म्हणाले…

“शिवसेनेबरोबर आमचे वैचारिक मतभेद होते. तरीही आमची सेनेबरोबर सरकार स्थापन केलं. त्यामुळे राष्ट्रहित आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही भाजपाबरोबर हातमिळवणी केली. आणि सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला,” असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

Story img Loader